Kranti Redkar Wedding Anniversary : मराठी सिनेविश्वातील अभिनेत्री क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियाद्वारे अनेकदा चर्चेत असते. अभिनयाबरोबरच क्रांती तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे अधिक चर्चेत असते. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. लेक व पती समीर वानखेडे यांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे ती शेअर करत असते. अशातच आता क्रांतीने तिच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण होताच खास पोस्ट शेअर केली आहे. क्रांती व समीर यांचे लव्ह मॅरेज आहे. बरेचदा ही जोडी अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावताना दिसते.
क्रांतीने तिच्या लग्नाचे खास फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आजपासून आठ वर्षांपूर्वीचे माझे प्रेम आणि अनंतकाळपर्यंत. आम्ही नेहमी एकमेकांना सांगतो की, आपलं व्हायचे होते आणि आपल्या नशिबात होतं. माझ्या आयुष्यात मी तुझा आत्मा तुझा जीव निवडला आहे. २७ वर्षांपूर्वी मी ज्या दिवशी तुला माझ्या वर्गात पाहिले होते त्यादिवशी मी तुला ओळखते असे मनातल्या मनात वाटले पण माझ्या मुलांचे वडील फक्त चार बाकांच्या अंतरावर बसले आहेत हे कधीच कळले नाही. आम्ही खूप पुढे आलो आहोत. आपल्या सभोवतालच्या सर्व चढ-उतारांसह आपण जगू शकतो कारण आपण एक आहोत. तू माझी शक्ती आहेस आणि मी तुझी आहे”.
आणखी वाचा – रणबीर कपूरचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, राहाबरोबर मैदानात खेळतानाचे फोटो समोर
तिने पुढे म्हटलं की, “माझे अद्भुत पती आनंदी राहा. तुम्ही अद्वितीय आहात आणि मला ते समजले आहे. हे जग तुमच्यासाठी भाग्यवान आहे. पुनश्च: छबिल गोडोतबद्दल धन्यवाद”. समीर वानखेडेंनी काही दिवसांपूर्वी ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा अवधूत गुप्तेंनी समीर यांना सरकारी नोकरीत असणारे त्यांच्याच क्षेत्रात सोयरिक करतात. मग तुम्ही क्रांतीला कुठे शोधलं? असा प्रश्न विचारला.
आणखी वाचा – अनुष्काचा खरा चेहरा आला समोर, पारू अहिल्यादेवींसमोर सत्याचा उलगडा करणार का?, मोठा ट्विस्ट
त्यावर समीर यांनी सांगितलं की क्रांती व समीर यांचा प्रेमविवाह आहे, लोकांना माहीत नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो. तेव्हापासून मी तिला आवडायचो, नंतर आम्ही लग्न केलं,” असं समीर यांनी सांगितलं. ‘तुम्ही कॉलेजमध्ये तिला प्रपोज केलं नाही का?’ असं विचारलं असता समीर म्हणाले, “नाही, इगो इश्यूज असतात ना, त्यामुळे मी अप्रोच केलं नाही. पण मलाही ती आवडायची. मग तिनेच मला विचारलं. मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं.”