Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे लग्नानंतरच्या विधींसाठी अहिल्यादेवींनी अनुष्काची निवड केलेली असते. अनुष्का तयार होण्यासाठी जाते तर, आदित्य याकडे एक काम म्हणून पाहतो आणि अहिल्यादेवींच्या शब्दाखातर तो हे फोटोशूट करायला तयार होतो. मात्र त्याला या फोटोशूटसाठी पारूच त्याच्याबरोबर हवी असते. त्यामुळे त्याचा राग अनावर होत असतो. दिग्दर्शकाला जेव्हा समजतं की, पारू ऐवजी अनुष्का फोटोशूटसाठी तयार झाली आहे हे ऐकल्यावर दिग्दर्शक सुरुवातीला नकार देतो. तेव्हा अहिल्यादेवी उत्तर देतात की हा माझा निर्णय आहे तेव्हा आदित्य ही अहिल्यादेवींचा निर्णय आहे असं म्हणत दिग्दर्शकास तसे करण्यास सांगतो.
त्यानंतर अनुष्का तयार होत असते आणि तितक्यात काही गुंड फोन करुन तिच्याकडे पैशाची मागणी करतात. किर्लोस्कर बंगल्याबाहेरच ते उभे असतात. त्या वेळेला पारू अनुष्काला मदत करायला म्हणून येते तेव्हा अनुष्का गडबडीने मी लगेच जाऊन येते असं म्हणत जाते. तेव्हा पारूच्या लक्षात येतं की, अनुष्का नेमकी कुठे गेली आहे हे पहाव लागेल. तितक्यात अहिल्यादेवी अनुष्काला बोलवायला येतात. तेव्हा ती रूममध्ये नसते आणि पारू सांगते की, मी अनुष्का मॅडमला शोधून येते. अनुष्का गुंडांची वाट पाहत असते तेव्हा तिला घरातून सगळेच फोन करत असतात. आदित्य सुद्धा फोन करतो तेव्हा आदित्यला ती खोटं सांगते की, एका गरजूला पैशांची गरज होती म्हणून मी त्यांची मदत करायला आले आणि मी लगेचच आत येत आहे.
आणखी वाचा – दारू पिऊनच स्वतःच्या लग्नासाठी मंडपात उभे राहिले होते ऋषी व नीतू कपूर, गिफ्टमध्ये दगड मिळालेले अन्…
तर पारू अनुष्काच्या पालथीवर असते. अनुष्का त्या गुंडाच्या हातात पैशाची बॅग ठेवते आणि तिथून निघून जाते. ते गेल्यानंतर पारू गुंडांच्या मागोमाग जाते तेव्हा गुंड पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे असलेल्या वकीलाला पैशाची बॅग देतात आणि पारूची छेड काढणाऱ्या मुलांना ते गुंड सोडवून घेतात. तेव्हा हे सगळं घडवून अनुष्काने घडवून आणलं असल्याचं पारूसमोर येत मात्र अनुष्का असं का करते हे पारूला काही कळत नाही.
आणखी वाचा – ‘पाताल लोक’ सीरिज फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
त्यानंतर प्रीतम पारुला घरी बोलावून घेतो. फोटोशूट साठी सगळेच तयार झालेले असतात आणि गृहप्रवेशाचा सीन सुद्धा शूट केला जातो. त्यावेळेला आदित्यला अनुष्काच्या जागी पारु असल्याचा भास होतो आणि तो सहजपणे फोटोशूट पूर्ण करतो. आता त्या फोटोशूटमध्ये कोणता व्यत्यय तर येणार नाही ना हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.