आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ वे अधिवेशन मुंबईत सध्या सुरु आहे. दरम्यान, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले होते. यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. तसेच, शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक बॉलिवूड तारे-तारकांनीदेखील या सोहळयाला हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यानचे अनेक फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. (Bollywood Actors trolled on Viral Photo)
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला हे सर्व कलाकार उपस्थित राहिले होते. यावेळी शाहरुख व दीपिका यांनी वेस्टर्न लुक परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर, रणबीर-आलिया पारंपरिक ड्रेसमध्ये आले, जे अतिशय सुंदर दिसत होते. दरम्यान, या सोहळ्यादरम्यान एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख व दीपिका पुढील रांगेत, तर रणबीर-आलिया ही जोडी मागच्या रांगेत बसलेली दिसत आहेत.
हे देखील वाचा – रंगभूमी गाजवणारे अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्यक्षेत्रातील नावाजलेला पुरस्कार जाहीर, चाहत्यांकडून होत आहे कौतुक
अधिवेशनावेळी नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना आलियाने डोळे मिटले होते, तर रणबीर खाली मोबाईलकडे लक्ष देताना दिसला. मात्र, शाहरुख आणि दीपिका हे संपूर्ण भाषण ऐकताना दिसले. पण त्यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा बरंच काही सांगून जात होतं. या चौघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकरी यावेळी या कलाकारांना जोरदार ट्रोल करत आहे.
हे देखील वाचा – “आता घर, आपली माणसं आणि…”, अमेरिकेमध्ये राहिलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला भारतात परतण्याचे वेध, म्हणाली, “मायदेशी…”
एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “आलिया जगाची पर्वा न करता शांतपणे झोपली आहे. तर रणबीर एखाद्या बॅकबेंचरसारखा फोनमध्ये हरवला आहे. शाहरुख पूर्ण लक्ष देण्याचे नाटक करतो पण त्याचं मन कुठेतरी भटकताना दिसत आहे. आणि दीपिका गंभीर चेहरा करून ऐकत आहे.” तर आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, “सगळ्यांनाच कंटाळा आला… आलीय तर खरंच झोपली आहे. यात तिची काही चूक नाही, कारण जर मी तिथे असतो तर हेच केलं असतं.” या फोटोवर अनेक मीम व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा होताना सध्या दिसत आहे. दरम्यान, आलिया काही दिवसांपूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात दिसली होती. जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. तर रणबीर कपूरचा ‘ऍनिमल’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.