शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘रामायण’मधील राम म्हणजेच अरुण गोविल यांची वर्षभराची नेमकी कमाई किती?, भाजपामधून लोकसभा निवडणूकही लढवणार

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 26, 2024 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Ramayana fame Arun Govil net worth see the details

'रामायण'मधील राम म्हणजेच अरुण गोविल यांची वर्षभराची नेमकी कमाई किती?, भाजपामधून लोकसभा निवडणूकही लढवणार

‘रामायण’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे अरुण गोविल. रामायण मालिका संपल्यानंतर गेले काही दिवस अरुण गोविल हे  नाव चांगलेच चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या राम मंदीरच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याला अरुण गोविल यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अशातच त्यांना नुकतीच त्यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे अभिनेते म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर अरुण गोविल आता स्वत:ला नेते म्हणून सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अरुण गोविल यांनी केवळ टीव्ही मालिकांमध्येच नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. नव्यानेच राजकारणात आलेल्या अरुण गोविल यांच्याकडे किती मालमत्ता आहे, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे, चला तर जाणून घेऊयात अरुण गोविल यांची एकूण संपत्ती किती आहे याबद्दल.

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

‘रामायण’ या धार्मिक मालिकेतून लोकप्रिय झाल्यानंतर अरुण गोविल यांनी त्यांच्या मानधनात तब्बल २५ टक्के वाढ केली होती. रिपोर्ट्सनुसार, अरुण गोविल यांनी  ‘OMG 2’ चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन घेतले होते. तरीही त्यात त्यांची भूमिका छोटीच होती. अशातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटासाठी अरुण गोविल यांनी ८० लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात आले.

आणखी वाचा – Video : चष्मामधून रवीना टंडन उडवत होती पाणी, अभिनेत्रीची भलतीच पिचकारी, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

काही अहवालांवर विश्वास ठेवला तर अरुण गोविल हे दरवर्षी १० ते १२ लाख रुपये कमावतात. अभिनय आणि जाहिराती हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. अरुण गोविल यांचे मुंबईत स्वतःचे घर असून नुकतीच त्यांनी एक आलिशान कारही खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुण गोविल यांच्याकडे सध्या ३८ ते ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

आणखी वाचा – Video : “अरे छपरी”, लाईव्ह मॅचमध्येच हार्दिक पांड्याचा चाहत्यांकडून अपमान, जोरजोरात ओरडू लागले अन्…; पत्नीलाही बघवेना, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, एका टॉक शोमध्ये अरुण गोविल यांनी सांगितले होते की, त्यांना असे काहीतरी करायचे आहे जेणेकरुन लोक त्यांना कायम लक्षात ठेवतील आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळेल. त्याप्रमाणे अरुण गोविल यांना ‘रामायण’ मालिकेद्वारे अमाप लोकप्रियता मिळाली असून आता राजकरणाद्वारे ते लोकांच्या अधिक काळ स्मरणात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

Tags: Arun GovilRamayana Fame
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kiron Pollard about Rohit Hardik rift

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरुन हार्दिक पांड्या ट्रोल, रोहित शर्मावरुन डिवचणाऱ्यांना पोलार्डचं उत्तर, म्हणाला, "आम्ही जे काही करतो ते…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.