रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुभमंगल सावधान! रकुल प्रती सिंह व जॅकी भगनानीचा शाही विवाहसोहळा संपन्न, कलाकारांची गर्दी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 21, 2024 | 5:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding

शुभमंगल सावधान! रकुल प्रती सिंह व जॅकी भगनानीचा शाही विवाहसोहळा संपन्न, कलाकारांची गर्दी

सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय कपल आज विवाहबंधनात अडकलं आहे. जॅकी भगनानी व रकुल प्रीत सिंग या दोघांनी सप्तपदी घेत लग्नसोहळा उरकला आहे. आज २१ फ्रेब्रुवारी बुधवार रोजी त्यांच्या कुटुंबातील सदस्य व जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे. रकुल व जॅकी यांनी त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारताबाहेर न जाता गोव्याची निवड केली. (Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding)

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रकुल व जॅकी यांचे लग्न पारंपरिक अंदाजात आनंद कारज पद्धतीने पार पडले. दोघांनी सिंधी पद्धतीने हा सोहळा उरकला असल्याचं समोर आलं आहे. या नववधूवराच्या लग्नसोहळ्यात फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. त्यांच्या चाहत्यांना लग्नातील लूक पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. रकुल व जॅकी यांच्या लग्नसोहळ्याची सुरुवात हळदी समारंभाने झाली. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होताच त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आणखी वाचा – जन्मतःच सोशल मीडिया स्टार झाला विराट कोहली-अनुष्का शर्मा यांचा लेक, नेमकं काय घडलं?, लोकही आश्चर्यचकित अन्…

View this post on Instagram

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

त्यांनतर दोघांच्या मेहेंदी व संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोघांच्या जवळच्या मित्र मंडळींनी व कुटुंबियांना धमाल केली. जॅकी व रकुलच्या संगीत सोहळ्यात, शिल्पा शेट्टीने तिचा पती राज कुंद्रासह परफॉर्म केले. याशिवाय या दोघांच्या लग्नसोहळ्याला अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, रितेश देशमुखसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही गोव्याला जाताना दिसले.

आणखी वाचा – चेहऱ्यावरील काळे डाग-मुरुम होतील गायब, त्वचाही होईल सुंदर, ‘हा’ सोपा उपाय केल्यामुळे पडेल सौंदर्यात भर

दरम्यान, रकुल प्रीत सिंगने अलीकडेच ‘योग्य जोडीदार’ असण्याचे महत्त्व सांगितले. अभिनेत्रीने ‘कॉस्मोपॉलिटन इंडिया’शी बोलताना स्पष्ट केले की, “महत्त्वाकांक्षी महिलांनी केवळ समजून घेणारा नव्हे तर जबाबदाऱ्या वाटण्यासाठी तयार असणारा जोडीदार निवडावा. योग्य जोडीदार मिळणे महत्त्वाचे आहे.”

Tags: entertainmentRakul Preet Singh and Jackky BhagnaniRakul Preet Singh and Jackky Bhagnani marriageRakul preet singh and Jackky bhagnani wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Funny Video

Video : देशमुखांची सून कॅमेऱ्यासमोरच नवरा रितेश देशमुखच्या पाया पडली अन्…; महाराष्ट्राच्या दादा-वहिनीचा व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.