सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश व जिनिलिया दोघांच्या बॉण्डिंगचे लाखो चाहते दिवाने आहेत. बॉलिवूडसह मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून बरेचदा या जोडीचं उदाहरण दिलं जातं. रितेश-जिनिलियामधील नवरा-बायकोचं बॉण्ड हे खास असल्याचे नेहमीच दिसून आलं आहे. मनोरंजनसृष्टीत कायम चर्चेत असणारी ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. (Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Funny Video)
सोशल मीडियावरही रितेश व जिनिलिया बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते एकमेकांबरोबरचे अनेक रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या या गमतीशीर व्हिडीओंना चाहत्यांचीही पसंती मिळालेली पाहायला मिळते. अशातच रितेश-जिनिलिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. रितेश-जिनिलिया यांच्या या गमतीशीर व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
“पूर्ण जग फिरलात तरी भारतीय पत्नीसारखी संस्कारी बायको तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. आमची बायको कधीही आम्हाला ए गाढवा, अरे गाढवा असं बोलत नाही, त्या शॉर्टकटमध्ये ए जी, ओ जी, सुनो जी असं बोलतात”, अशी ही गंमतीशीर रील रितेशने केली असून दोघेही या रीलवर अभिनय करताना दिसत आहेत. या व्हिडीओत रितेश बोलताना जिनिलियाची फजिती झालेलीही पाहायला मिळाली आहे. या व्हिडीओत गमतीत जिनिलिया रितेश देशमुखच्या पाया पडताना दिसली. त्यांची ही रील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे. देशमुख कुटुंबीयांचे सर्वच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
रितेश व जिनिलिया दोघेही स्वतःबरोबरचं त्यांच्या मुलांचेही अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या दोन्ही मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी कायमच त्यांचं कौतुक करत असतात. रितेश व जिनिलिया यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांचाही सुखाचा संसार सुरु असून त्यांच्या संसारासह ते त्यांच्या कामाकडेही लक्ष देताना दिसत आहेत.