सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“धर्मेंद्रजींचे दोन-तीन दिवसाआधीच निधन झालेले”, अभिनेत्रीचा गंभीर आरोप, देओल कुटुंबीयांना विचारले अनेक प्रश्न

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2025 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Sawant On Dharmendra Death

"धर्मेंद्रजींचे दोन-तीन दिवसाआधीच निधन झालेले", अभिनेत्रीचा गंभीर आरोप, देओल कुटुंबीयांना विचारले अनेक प्रश्न

Rakhi Sawant On Dharmendra Death : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तातडीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे शेवटचे दर्शनही चाहत्यांना उपलब्ध करुन देण्यात आले नाही. यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. धर्मेंद्र यांचे अनेक चाहते त्यांच्या घराबाहेर ढसाढसा रडताना दिसले. देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या आजारपणाची, निधनाची बाब खासगी ठेवल्याने हा नाराजीचा सूर चाहत्यांमध्ये अधिक असल्याचा पाहायला मिळाला. यावर आता लोकप्रिय अभिनेत्रीनेही सवाल उपस्थित केला आहे. धर्मेंद्र यांचे शेवटचे दर्शन घेता आलं नसल्याने अभिनेत्री राखी सावंतनेही प्रश्न विचारला.

चाहत्यांना धर्मेंद्र देओलला शेवटचे पाहू न दिल्याबद्दल राखी सावंतने पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली की, “अभिनेत्याला ज्या राज्य सन्मानाने निरोप द्यायला हवा होता, देओल कुटुंबाने तसे केले नाही”. अभिनेत्रीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “धर्मेंद्र संपूर्ण देशाचे हिरो होते, मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत त्यांच्या अभिनयाचे चाहते होते. बिग बॉसच्या वेळी मी त्यांच्यासोबत स्टेजवर डान्सही केला, पण त्याच्या चाहत्यांना त्यांची शेवटची झलकही दिली गेली नाही. ते केवळ देओल कुटुंबाचा भाग नव्हते. मला मान्य आहे की ते तुमचे वडील होते, आम्ही त्यांचा आदर करतो, पण ते तुमचे वडील होण्यापूर्वी ते देशाचे हिरो होते, ते आमचे हिरो होते”.

आणखी वाचा – “त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी…”, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पत्नी हेमा मालिनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझे उरलेले आयुष्य…”

View this post on Instagram

A post shared by Crazy 4 Bollywood (@crazy4bolly)

ती पुढे म्हणाले की, “ज्याप्रमाणे श्रीदेवी आणि राजेश खन्ना यांना राज्य सन्मानाने निरोप देण्यात आला होता. तसाच प्रकार धर्मेंद्र यांच्यासोबत झाला नाही. त्यांच्या स्मरणार्थ एक फूलही वाहता आले नाही. देओल कुटुंबाने असे का केले हे आम्हाला माहित नाही, परंतु मला असे म्हणायचे आहे की ते आमचे हिरो होते आणि ते या सन्मानास पात्र होते. देशभरात त्यांचे लाखो चाहते आहेत, ज्यांना त्यांना शेवटचे पाहायचे होते”.

आणखी वाचा – “मी कोणाचेही घर फोडलेले नाही”, कुमार सानूबरोबरच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत कुणिका सदानंद स्पष्टच बोलली, म्हणाली, “त्यांच्या वैवाहिक आयुष्यात…”

याशिवाय राखीने सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मला अनेकांनी सांगितले. ते स्वतः स्वप्नात माझ्याकडे आले. तेथील रुग्णालयातील डॉक्टरांचीही भाषणे झाली. त्याच्या चाहत्यांना त्यांना भेटू दिले नाही याचे मला खूप वाईट वाटले”. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे राखीने वाढदिवसाचे सेलिब्रेशन पुढे ढकलले होते. यादरम्यान, तिच्या वाढदिवसाविषयी बोलताना राखीने सांगितले की, “माझा वाढदिवसही २५ नोव्हेंबरला होता आणि पार्टीची पूर्ण तयारी झाली होती. मात्र त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आम्ही पार्टी रद्द केली”.

Tags: Dharmendra Deathentertainmentrakhi sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Anushka Sarkate Mehendi Ceremony
Entertainment

मेहंदी है रचनेवाली! अनुष्का सरकटेच्या हातावर रंगली निखिलच्या नावाची मेहंदी, खास लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

जून 22, 2026 | 9:27 am
Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
Next Post
Sunny Deol bobby deol net worth

धर्मेंद्र यांच्या दोन मुलांत श्रीमंत कोण?, सनी देओल आणि बॉबी देओलची एकूण संपत्ती आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.