मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र यांच्या दोन मुलांत श्रीमंत कोण?, सनी देओल आणि बॉबी देओलची एकूण संपत्ती आहे तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2025 | 4:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunny Deol bobby deol net worth

धर्मेंद्र यांच्या दोन मुलांत श्रीमंत कोण?, सनी देओल आणि बॉबी देओलची एकूण संपत्ती आहे तब्बल…

Sunny Deol bobby deol net worth : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २९ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब हळहळले आहे. धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करताच दोन्ही मुले भावूक झाली. धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओलने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी हिने पहिली प्रतिक्रिया दिली. तर सनी देओल आणि बॉबी देओल यांनी वडिलांच्या निधनानंतर आतापर्यंत मौन बाळगले आहे आणि कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सनी देओल आणि बॉबी देओल दोघेही अभिनयाच्या दुनियेत सक्रिय आहेत आणि नेहमीच ते आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना प्रभावित करत असतात. सनी आणि बॉबीने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघांनीही चित्रपटातून मोठी कमाई केली आहे. सनी आणि बॉबीने पुनरागमन केल्यापासून ते सर्वत्र चर्चेत आहेत. धर्मेंद्र यांच्या दोन मुलांमध्ये कोण जास्त श्रीमंत आहे याबाबतचे एक वृत्त माध्यमाद्वारे समोर आलं आहे.

आणखी वाचा – “त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी…”, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पत्नी हेमा मालिनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझे उरलेले आयुष्य…”

‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सनी देओलची संपत्ती १३० कोटी रुपये आहे. सनी देओलसाठी हे वर्ष खूप खास आहे, त्याच्या चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार, सनी देओलचा विलेपार्ले येथे एक बंगला आहे ज्याची किंमत सहा कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचा जुहूमध्ये एक बंगला आहे ज्यामध्ये ते कुटुंबासह राहतात. या दोन बंगल्याशिवाय सनी देओलची मुंबईत अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. सनीची पंजाबमध्येही जमीन आहे. त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, सनी देओलला आलिशान कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे Audi A8L, Land Rover Defender 110 देखील आहे.

आणखी वाचा – “धर्मेंद्रजींचे दोन-तीन दिवसाआधीच निधन झालेले”, अभिनेत्रीचा गंभीर आरोप, देओल कुटुंबीयांना विचारले अनेक प्रश्न

जेव्हापासून बॉबी देओलने इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे, तेव्हापासून तो मुख्यतः नकारात्मक भूमिकांमध्ये दिसला आहे. त्याची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. रिपोर्ट्सनुसार, बॉबीची एकूण संपत्ती ६६.७ कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो ५ ते ८ कोटी रुपये मानधन घेतो. त्याच्याकडे आलिशान गाड्यांचा संग्रहही आहे.

कोण अधिक श्रीमंत आहे
एकूण संपत्तीच्या बाबतीत, सनी देओल त्याचा धाकटा भाऊ बॉबी देओलपेक्षा श्रीमंत आहे. दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम असून ते अनेकदा एकत्र फोटो शेअर करत असतात.

Tags: bobby deolDharmendra Deathsunny deol
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Next Post
Dharmendra Prayer Meet

धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी आणि दोन्ही मुली नव्हत्या; सनी व बॉबी देओल झाले भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.