Anushka Sarkate Mehendi Ceremony : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. येत्या २४ जून रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींना आता उत्साहात सुरुवात झाली आहे. लग्नाच्या तयारीसोबतच मेहंदी समारंभाचे खास क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. लग्नाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना अनुष्काच्या हातावर निखिलच्या नावाची मेहंदी रेखाटण्यात आली आहे. पारंपरिक आणि आकर्षक डिझाइनने सजलेल्या मेहंदीमध्ये निखिलचे नाव खास पद्धतीने लपवण्यात आले आहे.
नव्या आयुष्याच्या सुरुवातीपूर्वीचा हा खास क्षण अनुष्कासाठी भावनिक आणि आनंददायी ठरला आहे. मेहंदी समारंभात कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. आनंदी वातावरण, संगीत आणि हशा-टाळ्यांच्या गजरात हा सोहळा रंगला. अनुष्का आणि निखिल यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये सुरू आहे. दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत उत्सुकता आणखी वाढली होती. आता लग्नविधींना सुरुवात झाल्याने त्यांच्या चाहत्यांना या सोहळ्याची झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
आणखी वाचा – ‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर
मेहंदी समारंभासाठी अनुष्काने पारंपरिक आणि आकर्षक पोशाखाची निवड केली होती. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. हातावरची सुंदर मेहंदी आणि त्यात कोरलेले निखिलचे नाव या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. दुसरीकडे निखिलदेखील लग्नाच्या तयारीत व्यस्त असून दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २४ जून रोजी पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या विवाहसोहळ्याकडे मराठी मनोरंजन विश्वासह चाहत्यांचेही लक्ष लागले आहे. लग्नापूर्वीचे विविध विधी, समारंभ आणि त्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले जात असून चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




