ड्रामा क्वीन राखी सावंत व आदिल खान यांच्यामधील वाद सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर आदिलने पत्रकार परिषद घेत तिच्यावर गंभीर आरोप केले. आता आदिलच्या सगळ्या आरोपांवर राखीने उत्तर दिलं आहे. राखीनेही पत्रकार परिषद घेत तिच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. शिवाय आदिलच तिला त्रास देत होता असं राखीने म्हटलं. याव्यतिरिक्त तिने आदिलवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली, कपडे फाडले, बेदम मारलं असल्याचं राखीने सांगितलं. ती म्हणाली, “मी जन्मापासूनच हिंदू धर्माचं पालन करते. पण आईला ख्रिश्चन धर्मावर विश्वास होता. तिने त्या धर्माचा स्वीकार केल्यानंतर माझा कल तिकडे होता. आदिलबरोबर लग्न झाल्यानंतर नमाजदेखील करण्यास मी सुरुवात केली. पण मुस्लिम धर्माचा स्वीकार करण्यासाठी त्याने मला मला जबरदस्ती केली. दरम्यान आदिलने मला खूप मारलं”.
आदिलबरोबर कशी ओळख झाली? याबाबत बोलताना राखी म्हणाली, “माझी मैत्रीण शैलीच्या माध्यमातून मी आदिलला भेटले. सेकण्ड हँड कारचा त्याचा व्यवसाय आहे. मलाही कार खरेदी करायची होती. त्यामुळे तू म्हैसूरमध्ये ये असं त्याने मला सांगितलं. मी माझ्या भावाबरोबर तिथे गेले. माझ्या भावाने त्याला तिथे दोन रुम बूक करण्यास सांगितल्या. आदिल अचानक माझ्या रुममध्ये आला. त्याने माझे कपडे फाडण्यास सुरुवात केली. त्याच्या दुसऱ्यादिवशी आदिल माझ्याजवळ आला आणि त्याने मला म्हटलं की, तू घाबरु नकोस मी तुझ्याबरोबर लग्न करेन. हे ऐकूनच मी त्याच्या प्रेमात पडले”.
आणखी वाचा – दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली सिद्धार्थ चांदेकरची आई, अभिनेता म्हणतो, “आता मी तुझं लग्न लावतोय कारण…”
पुढे राखी म्हणाली, “गोव्यामध्ये आम्ही दोघांनी लग्न केलं. पण जेव्हा मी आदिलकडे लग्नाचं सर्टिफिकेट मागितलं तेव्हा त्याने माझ्याकडे लग्नाचा पुरावा नाही म्हणत ते देणं टाळलं. लग्नानंतर जवळपास आठ महिने तो मला खूप मारायचा. जेव्हा मी ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आली तेव्हा मी गरोदर होते. आदिलच्या गर्लफ्रेंडबाबत जेव्हा मला कळलं तेव्हा माझा गर्भपात झाला”. न्यूड व्हिडीओ काढले, हनिमूनदरम्यानचे व्हिडीओ तसेच बाथटबमधील व्हिडीओ, आंघोळ करतानाचे व्हिडीओ आदिलने काढले असल्याचा धक्कादायक खुलासा राखीने केला आहे. शिवाय ४७ लाख रुपयांना आदिलने माझे न्यूड व्हिडीओ विकले असल्याचंही राखीने म्हटलं आहे.