रविवार, ऑक्टोबर 1, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - “मला बदनाम करण्यासाठी त्याने पैसे वाटले”, कंगना रणौतचा करण जोहरवर गंभीर आरोप, म्हणाली, “मला भीती…”

“मला बदनाम करण्यासाठी त्याने पैसे वाटले”, कंगना रणौतचा करण जोहरवर गंभीर आरोप, म्हणाली, “मला भीती…”

Sneha GaonkarbySneha Gaonkar
ऑगस्ट 23, 2023 | 1:43 pm
in Bollywood Gossip
Reading Time: 1 min read
Kangana Ranaut On Karan Johar

“मला बदनाम करण्यासाठी त्याने पैसे वाटले”, कंगना रणौतचा करण जोहरवर गंभीर आरोप, म्हणाली, “मला भीती…”

बॉलिवूड मधील बिनधास्त व्यक्तिमत्व म्हणून ओळख करून दिली जाते ती अभिनेत्री कंगना रनौतची. सडेतोड, स्पष्ट व्यक्तिमत्व असलेली कंगना नेहमीच ट्रोल होताना दिसते. बॉलिवूडची क्वीन म्हणून तिने सिनेसृष्टीत स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली आहे. वादग्रस्त विधान करत ती नेहमीच चर्चेत असते. विशेषतः करण जोहर व कंगना रनौतमधील वाद कायमच चिघळत असतात. कंगना व करण यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. (Kangana Ranaut On Karan Johar)

नुकत्याच एका मुलाखतीत करण जोहरने भाष्य करत ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. कंगना पर्यंत ही बातमी पोहचताच कंगनाने यावर प्रतिक्रिया देत चांगलीच कानउघडणी केली आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राच्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमाला करण जोहरने हजेरी लावली होती, त्यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी करण जोहरला “तुला राजकीय घटनेवर आधारित कोणता चित्रपट पाहायला आवडेल?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने “१९७५ दरम्यान देशभरात लागू केलेल्या आणीबाणीची अन् तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यावर आधारित ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे”, असं म्हटलं. यावर कंगना रनौतने प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे.

आणखी वाचा – “सब में और मेरे में बहुत फरक है”, बहुचर्चित हिंदी वेबसीरिजमध्ये मराठमोळ्या कलाकारांची फौज, ट्रेलरमध्ये दिसली भरत जाधव यांची झलक

Ha ha last time when he said he was excited to see Manikarnika, the worse smear campaign of my life was unleashed upon me on its releasing weekend … almost all main actors working in the film were paid to sling mud on me and sabotage the film and suddenly the most successful… https://t.co/iruVo5wq5o

— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 22, 2023

कंगनाने ट्विट करत म्हटलं की, “हा… हा… गेल्यावेळी त्याने ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चित्रपट प्रदर्शनाच्या आठवड्यात माझ्याविरोधात बदनामी केली होती. मला बदनाम करण्यासाठी आणि माझ्या चित्रपटाचे नुकसान करण्यासाठी त्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांनाही पैसे दिले गेले. त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी ठरलेला विकेंड हा माझ्यासाठी वाईट स्वप्नात बदलला आणि आता पुन्हा एकदा मला भीती वाटू लागली आहे. कारण त्याने माझा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे”.

आणखी वाचा – मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती, न्यूड व्हिडीओ, मारहाण अन्…; राखी सावंतचे आदिलवर गंभीर आरोप, म्हणाली, “माझे कपडे फाडले आणि… ”

‘इमर्जन्सी’ या चित्रपटात कंगना रणौत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे.

Tags: emergencyentertainmentkangana ranautkaran johar

Latest Post

Parineeti-Raghav Pre Wedding Rituals
Bollywood Gossip

राघवचा फटका, परिणितीचा उत्साह अन्…, शाही विवाहापूर्वी चोप्रा व चड्ढा कुटुंबियांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, फोटो व्हायरल

ऑक्टोबर 1, 2023 | 7:13 pm
Aarya Ambekar sings a song for Chandramukhi 2 film
Marathi Masala

“असा अनुभव तुम्हाला आला?” प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गायलं कंगना रानौतच्या चित्रपटासाठी गाणं, अभिनेत्रीने केली कमेंट, म्हणाली, “शेवटी तू…”

ऑक्टोबर 1, 2023 | 6:09 pm
Rutuja Bagwe Mazya Gharachi Goshta
Television Tadka

“आईच्या इच्छेखातर…” ऋतुजा बागवेला नवीन घर घेण्यास तिच्या आई-वडिलांनी दिला होता पाठिंबा, म्हणाली, “माझ्या बाबांनी मला…”

ऑक्टोबर 1, 2023 | 4:57 pm
Bollywood Movies Week 1 Box Office Collection
Bollywood Gossip

‘फुकरे ३’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; ‘द वॅक्सिन वॉर’, ‘चंद्रमुखी २’ला मागे टाकत तीन दिवसांत केली इतकी कमाई

ऑक्टोबर 1, 2023 | 1:30 pm
Next Post
shiv thakare talks about his marriage

आधी ब्रेकअप आता बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर शिव ठाकरेचं अफेअर?, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणतो, "आताच माझं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist