Rakesh Roshan On Hrithik- Sussanne Divorce : हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक होते. अनेक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर मात्र या जोडीने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हृतिक व सुझान हे २०१४ मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर, हृतिक आणि सुझान दोघेही त्यांच्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. मात्र हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटामागील कारण काही स्पष्ट झालं नाही. अशातच आता आता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी दोघांच्या घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हृतिक सध्या सबा आझादला डेट करत आहे. तर सुझान अर्सलन गोनीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या जोडीदारासह फोटो पोस्ट करत असतात.
विशेष गोष्ट अशी आहे की हृतिक व सुझान दोघेही त्यांच्या जोडीदारांसह एकत्र पार्टी करताना दिसतात. राकेश रोशनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हृतिक आणि सुझानबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले की, “जे काही घडले ते त्यांच्यात घडले. माझ्यासाठी, सुझान आजही आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांच्यात एक गैरसमज होता आणि त्यांना तो सोडवता आला नाही, त्यामुळे गोष्टी बिघडत गेल्या. ती आमच्यासाठी आमच्या घरी आली आणि अजूनही आमच्या घराची सदस्य आहे”.
आणखी वाचा – दिल्लीच्या नाइट क्लबमध्येचही सैफ अली खानवर झाला होता हल्ला, चेहऱ्याचा नाश करण्याचीच दिलेली धमकी आणि…
यावेळी राकेश रोशन आपल्या मुलाशी असलेल्या त्याच्या बॉण्डविषयी बोलले. ते म्हणाले की, हृतिक आणि माझी मुलगी मला थोडेसे घाबरत. मला माहित नाही, कदाचित मी एक शिस्तीचा माणूस आहे. मला लवकरच राग येत नाही. मी कोणाचीही निंदा करणारी व्यक्ती नाही, परंतु मी एक अतिशय विचारी व्यक्ती आहे. जेव्हा ते दोघेही लहान होते, तेव्हा ते माझ्याशी उघडपणे बोलू शकले नाहीत परंतु आता ते माझ्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करतात. आता आम्ही घरी मित्रांसारखे आहोत”.
घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझान दोन्ही मुलांचे एकत्र मिळून सांभाळ करत आहेत. हृतिक आणि सुझान देखील दोन्ही मुलांसह सहलीला जातात. अनेकदा ते एकत्र स्पॉट होताना दिसतात. पालक म्हणून हृतिक व सुझान यांच्यात कोणताही दोष आढळणार नाही वा त्यांच्या नात्याचा त्यांनी त्यांच्या मुलांवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.