शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एक रुपयाही मानधन घेतेले नाही पण दहापटीने कमावले; ‘आनंद’ चित्रपटातील राजेश खन्ना यांचा काय आहे नेमका किस्सा?, ५१ वर्षांनी आला समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 12, 2024 | 12:24 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rajesh Khanna Incident

एक रुपयाही मानधन घेतेले नाही पण दहापटीने कमावले; 'आनंद' चित्रपटातील राजेश खन्ना यांचा काय आहे नेमका किस्सा?, ५१ वर्षांनी आला समोर

५३ वर्षांपूर्वी हृषीकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. चित्रपट निर्माता राज कपूर यांच्याबरोबरच्या दिग्दर्शकाच्या नात्यावर आधारित हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. अभिनेता रमेश देव यांनी एकदा या चित्रपटाबाबतचा एक प्रसंग सांगितला होता. यासाठी राजेश खन्ना यांनी एक रुपयाही मानधन घेतलं नसल्याचं सांगण्यात आलं. (Rajesh Khanna Incident)

रमेश देव यांनी सांगितलेला हा किस्सा चित्रपट इतिहासकार दिलीप ठाकूर यांनी ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ‘रमेशने एकदा मला सांगितले की, राज कपूर आजारी असताना हृषिकेश मुखर्जी यांना आनंदच्या कथेची कल्पना आली. या सिनेमात किशोर कुमारला मुख्य भूमिका करायची होती. दिग्दर्शक ऋषी यांनी मद्रास ते मुंबईच्या फ्लाइटमध्ये धर्मेंद्रला त्याची कथा सांगितली होती. पण नंतर राजेश खन्नाबरोबर शूटिंग सुरु केले.

आणखी वाचा – “सलमान इतके यशस्वी झालो नाही…” बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अरबाज खान स्पष्टच बोलला म्हणाला, “आई वडिलांच्या ओळखीने…”

दिलीप ठाकूर यांनी ‘आनंद’साठी राजेश खन्ना यांना कास्ट करण्यामागील कथा सांगितली. ते म्हणाले, “जेव्हा राजेशला कळले की ऋषी दाची खूप चांगली कथा आहे. म्हणून तो त्याच्या जवळ गेला. तेव्हा ऋषीने त्याला मोठ्या प्रमाणात तारखा देण्यास सांगितले कारण त्यावेळी अभिनेता खूप व्यस्त होता. आनंदचे शूटिंग २८ दिवसांत पूर्ण झाले. रमेशने मला सांगितले होते की, आनंदच्या शूटिंगसाठी राजेश दररोज दोन तास येणार होता”.

आणखी वाचा – गरोदर असल्याच्या चर्चांना कतरिना कैफने दिला पूर्णविराम, हटके व फिट अंदाजात दिसली अन्…; व्हिडीओ व्हायरल

दिलीप ठाकूर पुढे म्हणाले, ‘एक दिवस राजेश खन्ना आले नाहीत तेव्हा ऋषी दा रागावले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजेश खन्ना आले तेव्हा ऋषीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि कॅमेराबरोबर काहीतरी करायला सुरुवात केली. पण असे असूनही हा चित्रपट पूर्ण झाला. एवढेच नाही तर, अभिनेत्याने ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं चित्रपटासाठी स्वतःवर चित्रित करायला सांगितले, जे क्रेडिट गाणे होते. यासाठी त्याने कोणतेही मानधन घेतले नाही. पण त्याला त्याच्या शक्तीराज फिल्म्सच्या अंतर्गत आनंद चित्रपटाचे वितरण हक्क मिळाले होते. ज्याद्वारे राजेश खन्ना यांनी १० पट अधिक कमाई केली होती”.

Tags: bollywood movieentertainmentrajesh khannarajesh khanna incidentrajesh khanna movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Randeep Hooda expressed his opinion about the problems during doing Swatantryaveer Savarkar movie

“एक-दोन वर्षात खूप चढ-उतार आले पण”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डा स्पष्टच बोलला, म्हणाला, “जे झालं ते...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.