Raj Thackeray Suggestion To Use Electric Crematoriums : अंत्यसंस्कारावेळी लाकडं जाळणं हा मुद्दा आता चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. हो नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात माननीय राज ठाकरे यांनी हा मुद्दा काढला आणि त्यावर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर परखडपणे भाष्य केलं. दरम्यान, त्यांनी वृक्षतोड हा विषयही काढला. यावेळी बोलताना ते म्हणाले, झाडे लावा झाडे जगवा हा मुद्दा अनेकदा मतदानाच्यावेळी बोलला जातो. पण देशात हिंदूंचे अंतिमसंस्कार हे लाकडावरच होतात. त्यासाठी लाकूड येतं कुठून?, देशात जंगलतोड केल्याशिवाय लाकूड येणारच नाही. आणि यालाच पर्याय म्हणून विद्युतवाहिनी आली आहे. पण याचा वापर न करता परंपरेनुसार आम्ही सगळं करणार असं म्हणणारे कर्मट लोक काही कमी नाहीत”. राज ठाकरेंचा हा मुद्दा इतका चर्चेत आला की अनेकांनी या विषयाला पाठिंबा दर्शविलेला पाहायला मिळाला.
यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनीदेखील भाष्य करत राज ठाकरेंना पाठिंबा दर्शविला. सयाजी शिंदे हे पर्यावरण प्रेमी असून नेहमीच ते निसर्गासाठी कार्य करताना दिसतात. आता वृक्षतोडीवर भाष्य करणाऱ्या राज ठाकरे यांना सयाजी यांनी पाठिंबा देत भाष्य केलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, “माननीय राज ठाकरेंचे विचार महाराष्ट्राला नेहमीच भारावून टाकणारे असतात. मला वैयक्तिकरित्या सुद्धा त्यांचे विचार खूप आवडतात. अंतिमसंस्कारावेळी लाकडांचा वापर न करता विद्युत दाहिनीचा वापर करावा हा जो विचार त्यांनी मांडलाय तो अत्यंत महत्वाचा आहे. केवळ हिंदू धर्मच नाही तर संपुर्ण मानवजातीसाठी महत्वाचा आहे”.
पुढे ते म्हणाले, “शेवटी आपण जेव्हा मरतो किंवा जातो तेव्हा या ज्या काही परंपरा आहेत की मानवी शरीर हे लाकडात जाळलं पाहिजे त्यात सात मन लाकूड एका माणसापाठी जाळलं जातं. म्हणजे ३०० किलो लाकूड एक माणूस जाळताना लागत असेल तर ही जंगलं टीकणार कशी? आधीच सर्वबाजूने जंगलावर इतकं आक्रमण होतय तर मला वाटतं हा खरंच सुंदर विचार आहे. प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे की, मी जाताना विद्युत दाहिनीतच जाळा. माझ्या पुढच्या पिढीसाठी झाडं पाहिजेत. विनोद कुमार शुक्ला यांची एक कविता आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की माझ्य़ा मुलांसाठी एखादं तरी झाडं लावा. सगळीच झाडं जर तुम्ही संपवली, अन्नपाणी संपवलं, ऑक्सिजन संपवला तर काय होईल. त्यामुळे त्यांचा विचार मला अतिशय मान्य आहे”.
आपल्या संस्कृतीत अंत्यसंस्कारावेळी लाकडं जाळण्याला इतकं महत्त्व का आहे?
अंत्यसंस्कारावेळी लाकडं जाळण्याची पद्धत अनेक संस्कृती-धार्मिक परंपरेत आहे. आणि असे करण्यामागे काही धार्मिक, भावनिक कारणंही आहेत, जसे की मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळवून देणं, आणि मृतदेहाचं रूपांतरण करणं. काही संस्कृतींमध्ये, लाकडांनी जाळल्याने मृतदेहाचं रूपांतरण होऊन आत्मा शुद्ध होतो, असं मानलं जातं. काही धर्मांमध्ये, अंत्यसंस्काराद्वारे आत्म्याला नवीन जन्मासाठी तयार केलं जातं, असं मानतात.
अनेक संस्कृतींमध्ये, अंत्यसंस्कारासाठी लाकडं जाळणे ही एक पारंपरिक पद्धत आहे, जी पिढ्यानिशी जपली जाते. अंत्यसंस्कारावेळी लाकडांनी जाळल्याने मृत व्यक्तीला आदराने वागणूक दिली जाते, असं मानलं जातं.
लाकडं जाळल्याने जीवाणू नष्ट होतात आणि दूषित होण्याचा धोका कमी होतो. अंत्यसंस्कारावेळी लाकडं जाळणं ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर ती धार्मिक, भावनिक आणि सामाजिक अर्थांनी भरलेली आहे.
अंत्यसंस्कारावेळी लाकडं न जळता विद्युतदाहिनीची वापर करणे योग्य का आहे?
अंत्यसंस्कारावेळी लाकडं न जळता विद्युतदाहिनीचा वापर न करता नैसर्गिक साधन सामग्रीसारखी लाकडे जाळावी लागत नाहीत. यामुळे एकप्रकारे निसर्गाचे रक्षण केले जाते. झाड नसतील तर अन्नपाणी, आक्सिजन संपेल आणि याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होईल.