Sunil Grover Struggle : हरियाणातील एका छोट्या गावात जन्मलेल्या या मुलाला याची कल्पना नव्हती की तो भारतातील नामांकित आणि प्रसिद्ध विनोदवीरांपैकी एक असेल. तसे, या मुलासाठी या चित्रपटसृष्टीतील प्रवास काही सोप्पा नव्हता, परंतु चिकाटीने, कठोर परिश्रम आणि विलक्षण प्रतिभेमुळे, त्याने सिनेविश्वातील हे स्थान प्राप्त केले. बालपणातच त्याने आर्थिक संकटाचा सामना केला. गुरबातमध्ये आयुष्य व्यतीत करुनही त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. अखेरीस त्याने चंदीगडमधील पंजाब विद्यापीठातून थिएटरमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. स्टारडम साध्य करण्याच्या स्वप्नासह त्याने अखेर मुंबई गाठली. जिथे त्याच्या यशाचा मार्ग आव्हानांनी भरलेला होता. कित्येक वर्षांची मेहनत घेतल्यानंतर केवळ घरातच ओळखले जाणारे हे नाव न बनता संपूर्ण उद्योगात त्याच्या क्षमतेच्या बळावर स्वतंत्र ओळख देखील निर्माण केली. आणि हा अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर.
मुंबईतील सुनील ग्रोव्हरचे सुरुवातीचे दिवस कठोरतेने भरलेले होते. कारकीर्दीच्या सुरुवातीस तर त्याला ५०० रुपये मिळवणंही कठीण जात होतं. पैशाच्या संकटानंतरही तो मुंबईत राहिला आणि त्याचा असा विश्वास होता की एक दिवस त्याला नक्कीच यश मिळेल. सिनेसृष्टीत काम करत असताना त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला पण त्याने हार मारली नाही. चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करुन, त्याला ‘द कपिल शर्मा शो’ मधील गुत्थी या पात्रामुळे खरी ओळख मिळाली. यापूर्वी, आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटातही तो दिसला. शिवाय गुटर गू’मधीलही त्याचे काम साऱ्यांच्या पसंतीस उतरले. यानंतर सुनीलचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला आणि तो चित्रपट, वेबविश्वात झळकू लागला.
अनेक संघर्षांचा लढा देणाऱ्या आणि सिनेविश्वात स्वतःचे नाव कमावणाऱ्या सुनीलकडे आज मुंबईत स्वतःचं घर, गाडी आणि त्याच्या पत्नीची साथ आहे. त्याला आजवर त्याच्या पत्नीने खूप साथ दिली आहे. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत ती कायम अभिनेत्याबरोबर होती. २०२२ मध्ये, सुनील ग्रोव्हरच्या आयुष्याने खूप मोठं वळण घेतलं. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला आणि घाईघाईने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि यावेळी असे आढळले की त्याच्या हृदयात पूर्णपणे १०० टक्के ब्लॉक्स आहेत आणि एक धमनी ९० टक्के ब्लॉक्सपर्यंत आहे. अशा परिस्थितीत, त्याच्यावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता.
आणखी वाचा – आवाजासाठी प्यायली स्पर्मपासून बनवलेले कॉकटेल आणि…; अमेरिकन गायिकेचा धक्कादायक खुलासा, किळसवाणा प्रकार
अभिनेत्याची चार बायपास शस्त्रक्रिया केली. उपचार घेत बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर तो बारा झाला आणि पुन्हा स्क्रीनवर परतला. कपिल शर्माबरोबरचा त्याचा वाद सुरु असताना अभिनेता जीवन आणि मृत्यू याच्याशी संघर्ष करत होता. या दोघांमधील वादानंतर अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. जेव्हा अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केले गेले तेव्हा असे आढळले की, त्याला कोविड देखील झाला होता. त्यावेळी सुनील फक्त ४४ वर्षांचा होता. अशा परिस्थितीत, धोका वाढला, परंतु अभिनेत्याने धैर्याने हा कठीण काळ घालवला. शेवटच्या वेळी सुनील ग्रोव्हर नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या विनोदी कार्यक्रमात दिसला