Dharmendra Health Update : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते म्हणून धर्मेंद्र यांची विशेष ओळख आहे. ७०च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल ३०० चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. धर्मेंद्र यांचे संपूर्ण नाव धर्मेंद्र सिंह देओल आहे. मात्र, त्यांनी कधीच आपले पूर्ण नाव वापरले नाही. त्यांनी नेहमीच धर्मेंद्र हे पहिलेच नाव सगळीकडे वापरले. मात्र, आता तब्बल ६४ वर्षांनी त्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र मंगळवारी डोळ्याच्या क्लिनिकच्या बाहेर दिसले. यावेळी अभिनेत्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली पाहून चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळालं. क्लिनिकमधून बाहेर पडत असताना, ८९ वर्षीय अभिनेत्याने पापराजींना सांगितले की, ते खूप स्ट्रॉन्ग आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. धर्मेंद्र या व्हिडीओमध्ये डोळ्याच्या दवाखानाच्या इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत. आणि पापराजींबरोबर संवाद साधताना दिसत आहेत. यानंतर, त्याने आपल्या चाहत्यांचेही आभार मानले.
धर्मेंद्रची ही स्थिती पाहिल्यानंतर चाहते अस्वस्थ आहेत. बरेच लोक विचारत आहेत की, त्यांना नेमकं काय झाले आहे. हा व्हिडीओ पाहून बरेच लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडलेला आहे. नुकताच त्यांनी त्यांचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. यामध्ये, तो कारमध्ये एसीच्या हवेत न झोपता झाडाच्या सावलीत पलंगावर झोपलेले दिसले . १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटासह तात्यांनी अभिनय जगात पदार्पण केलं. २०२४ मध्ये ते शाहिद कपूर आणि कृति सेनन यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात दिसले. आता ते काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहेत.
धर्मेंद्र व हेमा मालिनी एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यांना लग्न करायचे होते. पण धर्मेंद्र यांच अगोदरच प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न झाले होते. ते आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही देऊ इच्छित नव्हते. त्यामुळे धर्मेंद्र यांनी आपला धर्म बदलत इस्लाम धर्मात प्रवेश केला. यानंतर त्यांनी नावातही बदल करत आपले नाव दिलावर खान ठेवले. तर हेमा मालिनी यांनीही आपले नावात बदल करत आयशा बी आर चक्रवर्ती केले. त्यानंतर १९८० मध्ये दोघांनी मुस्लिम पद्धतीनुसार लग्न केले.