सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एकतरी मुलीने माझं नाव घेऊदत तरच…”, पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “मी फक्त सॉफ्टवेअर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 17, 2024 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Raj Kundra On Pornography

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं मोठं वक्तव्य

Raj Kundra On Pornography : अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. इतकेच नाही तर अश्लील सामग्री तयार करणे आणि वितरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्राशी संबंधित अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले. २०१२ मध्ये, त्याला अश्लील सामग्री तयार आणि वितरित केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मात्र, राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला या प्रकरणात बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. राज कुंद्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत मौन सोडले आहे.

यावेळी बोलताना तो म्हणाला की, “आजपर्यंत मी कोणत्याही पोर्नोग्राफीचा, कोणत्याही प्रॉडक्शनचा किंवा पॉर्नशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा भाग झालो नाही. हे आरोप समोर आल्यावर खूप वेदना झाल्या. त्यात तथ्य व पुरावे नसल्याने जामीनही मंजूर करण्यात आला. मला माहित आहे की मी काहीही चुकीचे केलेले नाही. जोपर्यंत ॲपचा संबंध आहे, ती माझ्या मुलाच्या नावावर एक सूचीबद्ध कंपनी होती. त्यावर आम्ही तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा पुरवायचो”.

आणखी वाचा – ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लग्नानंतरची पहिली डेट, शेअर केले रोमँटिक फोटो, लूकने वेधलं लक्ष

राज कुंद्रा यांनी सांगितले की, त्यांनी त्या ॲपवर त्यांच्या भावजयच्या कंपनी केनरीनलाही सेवा दिली आहे. यामध्ये त्यांनी ब्रिटनमध्ये चालवलेले ॲपही लॉन्च केले. हे ॲप्लिकेशन प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलं होतं. यांत ए-रेट केलेले चित्रपट होते, परंतु अश्लीलता अजिबात नव्हती. त्याच्या सहभागाच्या प्रश्नावर राज कुंद्रा म्हणाले की, “मी फक्त एक तंत्रज्ञान प्रदाता आहे. एक मुलगी पुढे येऊन सांगुदे की ती राज कुंद्राला भेटली आहे किंवा त्याच्या एखाद्या चित्रपटात काम केले आहे किंवा राज कुंद्रा अशा कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करतो. सर्वत्र असं बोललं जात की, राज कुंद्रा सर्व १३ ॲप्सचा मास्टरमाइंड आहे, मी फक्त सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाशी संबंधित काम करतो आणि त्या ॲपमध्ये काहीही चुकीचे झाले नाही”.

आणखी वाचा – उर्फी जावेदला माहित नाही झाकीर हुसेन कोण?, प्रश्न विचारताच उत्तर देणं टाळलं, नेटकऱ्यांकडून ट्रोल

राज कुंद्रानेही शिल्पा शेट्टीबद्दल भाष्य केले आहे. पत्नीला या प्रकरणात ओढू नये, असे तो म्हणाला. या अभिनेत्रीने तिच्या मेहनतीने स्वत:चे नाव कमावले आहे. मीडिया मुद्दाम अभिनेत्रीचे नाव समाविष्ट करते, ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचते. राज कुंद्रा म्हणाला, “तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मला बोला . पण या सगळ्यात त्याच्या कुटुंबाला ओढता कामा नये”.

Tags: bollywood newsraj kundraRaj Kundra On Pornography
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
neetu kapoor ignore alia bhatt

"सासू ही सासूच असते", भर कार्यक्रमात नीतू कपूर यांनी सूनेकडे केलं दुर्लक्ष, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "यांचे नखरे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.