सोमवार, ऑगस्ट 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राज कावेरीला त्यांच्या घरात मिळते दुय्यम वागणूक छळ करण्याचा सानियाचा हेतू पाहून भडकले प्रेक्षक

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 18, 2023 | 7:06 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Raj Kaveri harassed

Raj Kaveri harassed

मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज आणि कावेरीची भूमिका पार पाडणारे अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले या नव्याकोऱ्या जोडीने प्रेक्षकाना वेड लावलं आहे. या नव्या जोडीच्या सोबतीला साथ लाभली ते अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची. ज्यांच्या अभिनयातील अनुभवाचा वापर पुरेपूर त्यांच्या अभिनयातून अनुभवता येतो. तर बऱ्याच संकटानंतर मालिकेमध्ये आता अखेर रत्नमाला या आजारातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. पण एक नवीन संकट रत्नमाला आणि राज कावेरीवर आलं आहे.(Raj Kaveri harassed)

====

हे देखील वाचा – ‘ऐका दाजीबा’वर केला होता पहिला डान्स, म्हणून आहे रश्मिकाचं मराठीशी खास कनेक्शन

====

रत्नमाला यांचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणारी किडनी वैदेहीने दिल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं. पण वैदेहीने त्यामागचा हेतू स्पष्ट करत मला राज नाही तर संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर हवी आहे अशी मागणी केली तरच मी किडनी डोनेट करेन असं सांगितलं.तर आईचा जीव वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता राज ने सगळी प्रॉपर्टी वैदेहीच्या नावावर करून टाकली तेव्हा वैदेही ने रत्नमाला यांना किडनी डोनेट करून त्यांचा जीव वाचवला.

त्यानंतर असं समोर आलं कि यामागे फक्त वैदेहीच डोकं नसून सानिया सुद्दा या गोष्टी सामील आहे. मी काहीही करून राजला तुला मिळवून देईन असं आश्वासन देऊन सानियाने ने आर्धी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. आणि राज कावेरीला त्रास देण्याचा हेतू ती आता पूर्ण करताना दिसत आहे. कधी राजला वैदेही कडे पाठवून, तर कधी कावेरीला पिज्जा बनवायला लावून नोकरांसारखं वागवण्याचा ध्यास सानियाने घेतल्याचा दिसून येत आहे. तर मालिकेत पुढे राज कावेरी गेलेली प्रॉपर्टी कधी मिळणार आणि ती मिळवण्यासाठी राज कावेरीला काय मेहनत घ्यावी लागणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.(Raj Kaveri harassed)

Tags: bhagya dile tu malamarathi malikamarathi serialraj kaveriserial update
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Next Post
ashwini kasar new serial

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अश्विनी गाजवणार छोटा पडदा; या नव्या मालिकेतून करणार पुनरागमन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.