नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार. अश्विनी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेत अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. (ashwini kasar new serial)
अश्विनी या मालिकेत साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेमुळे अश्विनी पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी निरनिराळ्या मालिकांमधून आणि निरनिराळ्या व्यक्तिरेखांमधून अश्विनी कासारने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेतून अश्विनीची एन्ट्री छोट्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.
पहा अश्विनीची नवी मालिका (ashwini kasar new serial)
‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेची टीम या मालिकेसाठीच कार्यरत आहे. हरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांबरोबरच आता अश्विनी कासार ही सुद्धा पोलीस गणवेशात पाहायला मिळणार आहे. यांचे हे स्पेशल ओप्रेशन स्कॉड मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

मालिकेची झलक जेव्हापासून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. अश्विनी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. १ मे पासून ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे.
====
हे देखील वाचा – सोज्वळ आणि मोहक अदांचा कावेरीचा अनोखा अंदाज
====
‘कमला’, ‘कट्टी बट्टी’, ‘सावित्रीज्योती’ या सारख्या मालिकेतून अश्विनीने छोटा पडदा गाजवला. आपल्या अभिनयाने सर्वांना आपलंसं करून घेणारी अभिनेत्री अश्विनी कासार खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बिनधास्त आणि स्टायलिश आहे. तिचा हा बिनधास्तपणा आपल्याला येत्या १ मे पासून ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत पाहायला मिळणार आहे.(ashwini kasar new serial)
अश्विनी सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असते. अश्विनीने आजवर मालिकांमधून चाहत्यांच्या मनावर राज्य केलेच आहे. त्यासोबतच अश्विनी तिच्या मोहक अदांनी नवनवीन फोटोशूट करून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. नुकतंच तिने पाण्यामध्ये भिजत केलेलं साडीतील फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडलं. या फोटोंदरम्यान अश्विनीच सौंदर्य अधीकच खुललं होत.
