Radhika Apte Baby First Photo : लग्नाच्या १२ वर्षानंतर अभिनेत्री राधिका आपटे आई झाली आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. राधिकाने आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर एका आठवड्यानंतर चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली. राधिकाने स्वत: ती मुलाची आई आहे की मुलीची हे उघड केले नसले तरी तिची मैत्रिण सारा अफझलने अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर टिप्पणी करत याचा खुलासा केला. अभिनेत्रीने ‘माय बेस्ट गर्ल्स’, असं म्हणत राधिकाला लेक झाली असल्याचा खुलासा केला. राधिका आपटेने आपल्या बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे.
राधिकाच्या समोर आलेल्या फोटोमध्ये ती लॅपटॉपवर काम करत आहे आणि तिच्या लहान मुलीला स्तनपानही करत आहे. राधिका आपटेच्या या फोटोवर चाहत्यांकडून खूप कमेंट्स येत आहेत आणि ते अभिनेत्रीवर आई झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. समोर आलेल्या या फोटोमध्ये राधिकाच्या लहान मुलीचा चेहरा दिसत आहे आणि चाहते तिच्यावर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “बाळ झाल्यानंतर माझी पहिली कामाची भेट. बाळ एक महिन्याचे आहे आणि ते स्तनपान करत आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राधिका आपटेला तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसल्यानंतर साऱ्यांना धक्का बसला. तिने पती बेनेडिक्ट टेलरबरोबर तिच्या पहिल्या गरोदरपणाची घोषणा केली मात्र ती या बातमीने नाराज होती. ज्याप्रमाणे राधिकाने तिची गर्भधारणा गुप्त ठेवली होती, त्याचप्रमाणे तिने बाळाची प्रसूती आणि लिंग देखील गुप्त ठेवले आहे”.
याआधी राधिका आपटेने ‘इटाईम्स’ला सांगितले होते की, यापूर्वी तिचा प्रेग्नन्सी अधिकृतपणे जाहीर करण्याचा कोणताही विचार नव्हता. तिला ते खासगी ठेवायचे होते. राधिकाने असेही सांगितले होते की तिच्या प्रेग्नेंसीबद्दल समजल्यानंतर ती दोन आठवडे स्वीकारु शकली नाही. याचे कारण असे की तिने आणि तिच्या पतीने कधीही मूल होण्याची योजना आखली नव्हती.