Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Haladi : ‘देवमाणूस २’ फेम अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या लग्नाच्या चर्चेने सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय. नुकताच या जोडीचा साखरपुडा समारंभ पार पडला असल्याचं समोर आलं. अत्यंत पारंपरिक व साधेपणाने पार पडलेल्या या साखरपुडा समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यानंतर आता किरण व वैष्णवी यांच्या हळदी समारंभातील फोटो ही समोर आले असल्याचे पाहायला मिळतंय. किरणला वैष्णवीच्या नावाची तर वैष्णवीला किरण च्या नावाची हळद लागली आहे. धमाल डान्स करत अगदी थाटामाटात किरण व वैष्णवी यांचा हळदी समारंभ पार पडला आहे. आज किरण व वैष्णवी ही जोडी विवाह बंधनात अडकणार आहे.
पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. किरण व वैष्णवी यांच्या हळदीच्या फोटोंवर शुभेच्छांचा व लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. ‘लागिर झालं जी’ मालिकेतील कलाकार तसेच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी किरण व वैष्णवी यांच्या हळदी समारंभाला उपस्थिती दर्शवलेली पाहायला मिळाली. धमाल डान्स करत तुफान राडे करत त्यांनी हा हळदी समारंभ गाजवला असल्याचं दिसतंय. यावेळी वैष्णवीने पिवळ्या रंगाची काठापदराची साडी नेसलेली पहायला मिळाली. तर त्यावर घातलेल्या डिझायनर ब्लाऊजने साऱ्यांचे लक्ष वेधलं.
किरणने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि लेहंगा घातलेला दिसला. नवरा नवरीच्या वेशात दोघेही खूपच सुंदर दिसत होते. किरण व वैष्णवी यांचा लग्न सोहळा हा कोकणात पार पडत असल्याचं समोर आलंय. सावंतवाडी पॅलेस येथे किरण व वैष्णवी यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत किरण व वैष्णवी यांचं लग्न पार पडणार आहे. नुकतेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटोही समोर आले.
आणखी वाचा – किरण गायकवाडचा साखरपुडा संपन्न, साधेपणाची होतेय सर्वाधिक चर्चा, लूकने वेधलं लक्ष
किरण व वैष्णवी यांच्या साखरपुडा समारंभातील मराठमोळा लूक साऱ्यांचं लक्ष वेधत आहे. साखरपुड्याला किरणने गुडघ्यावर बसून वैष्णवीला अंगठी घातली आहे, आणि तिच्या हातावर किसही केलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी दोघांचा हा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेत होता. आता किरण व वैष्णवी यांच्या लग्नाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे.