शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमचाच मुलगा आहे हे सिद्ध करा”, सिद्धू मुसेवालाच्या आईला मुलगा झाल्यानंतर पंजाब सरकारची विचित्र मागणी, गायकाचे वडील म्हणाले, “खूप त्रास…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2024 | 11:52 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
balkaur singh on punjab government

दिवंगत प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे आई-वडील बलकौर सिंह व चरण सिंह हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सिद्धूची आई चरण कौर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. चिमुकल्याच्या येण्याने मुसेवाला कुटुंबात कमालीचे आनंदाचे वातावरण आहे. चरण कौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी  आयव्हीएफच्या माध्यमातून दुसऱ्या मुलाला जन्म दिला. पण आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्रास दिल्याप्रकरणी बलकौर सिंह यांनी पंजाब सरकारवर आरोप केले आहेत. (balkaur singh on punjab government )

सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडिलांनी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या सर्व अफवा असल्याचे बोलले गेले. पण नंतर मात्र हे वृत्त खरं असल्याचे समोर आले. पण काही दिवसांनी जुळी मुलं होणार असल्याचे समोर आले मात्र तेव्हा सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. पण आता बाळाच्या येण्याने सर्व सुरळीत असतानाच बलकौर सिंह यांनी पंजाब सरकारकडून त्रास होत असल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा- नवऱ्यासह माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, अलिबागमध्ये कुटुंबियांबरोबर जेवण, धमाल-मस्ती अन्…; एकत्रित कुटुंबाचं कौतुक

View this post on Instagram

A post shared by Balkaur Singh (@sardarbalkaursidhu)

त्यांनी याबद्दल एक इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “वाहेगुरु यांच्या आशीर्वादाने आम्हाला आमचा मुलगा परत मिळाला आहे. पण सरकारकडून सकाळपासून मला त्रास होत आहे. ते वारंवार मुलाच्या जन्माच्या कागदपत्रांची मागणी करत आहेत”. पुढे ते म्हणाले की, “हा मुलगा आमचाच आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी ते माझी सतत विचारणा करत आहेत. मी सरकारला , मुख्यमंत्री भगवंत मान यांना विनंती करतो की सर्व उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. मी इथेच राहणारा आहे त्यामुळे नंतर मला तुम्ही जिथे बोलवाल तिथे मी येण्यासाठी तयार आहे”.

आणखी वाचा- आधी घटस्फोटाच्या चर्चा, आता अभिनेत्री अंकिता लोखंडे विकी जैनबरोबर पुन्हा अडकली लग्नबंधनात, फोटो व्हायरल

दरम्यान बलकौर सिंह यांना मुलगा झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, “शुभदीपला पाठिंबा देणाऱ्या लाखों लोकांच्या आशीर्वादाने देवाने त्याच्या लहान भावाला आमच्याकडे पाठवले आहे. देवाच्या आशीर्वादाने कुटुंब सुखरूप आहे आणि मी सर्व हितचिंतकांचे आभार मानतो”.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर २९ मे २०२२ रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्या अचानक मृत्यूने सर्व चाहत्यांना धक्का बसला होता.  

Tags: balkaur singhcharan singhmoosewala familynew born babySiddu moosewala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sameer Dharmadhikari On Married Life

समीर धर्माधिकारी यांची पत्नी कलाक्षेत्रामध्येच आहे कार्यरत, पहिल्यांदाच रिलेशनशिपबाबत केला खुलासा, म्हणाले, "आमचं लवकर लग्न झालं पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.