शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी घटस्फोटाच्या चर्चा, आता अभिनेत्री अंकिता लोखंडे विकी जैनबरोबर पुन्हा अडकली लग्नबंधनात, फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2024 | 10:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita lokhande vicky jain wedding photo)

लहान पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अंकिता लोखंडेचं नाव आवर्जून घेतलं जातं. अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. या मालिकेतून तिला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. त्यानंतर ती अनेक मालिका व रिॲलिटी शोच्या माध्यमातून समोर आली होती. नुकतीच ती ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीजनमध्ये दिसून आली होती. या शोमध्ये तिने पती विकी जैनबरोबर सहभाग घेतला होता. या शोच्या दरम्यान अंकिता व विकीमध्ये वादावादीही पाहायला मिळाली. यावरुन दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चादेखील सुरु झाल्या होत्या. (Ankita lokhande vicky jain wedding photo)

पण ‘बिग बॉस’ शो संपताच दोघांमध्ये सर्व सुरळीत असल्याचे दिसून आले. त्या दोघांमध्ये प्रेमही पाहायला मिळाले. आता सोशल मीडियावर दोघांचाही एक फोटो व्हायरल होत आहे.त्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. समोर आलेल्या फोटोमध्ये दोघेही पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे ते आता चौथ्यांदा लग्न करत आहेत असेही म्हंटले जात आहे.

आणखी वाचा – “तुला इथे काम मिळणार नाही…”, समीर धर्माधिकारींना दिलेला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सल्ला, आठवण शेअर करत म्हणाले, “तू मराठीत…”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

सदर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विकी व अंकिता हे अग्निकुंडाभोवती हातात हात घेऊन फेरे मारताना दिसत आहेत. तसेच अंकिता दाक्षिणात्य पेहरावामध्ये दिसत आहे तर विकीने शर्ट व पॅंट परिधान केली आहे. दोघांनीही गळ्यात हार घातले आहेत तसेच हातात हात घेऊन एकमेकांकडे स्मितहास्यदेखील करत आहेत. बाजूला भटजीही उभे असलेले दिसत आहेत.

आणखी वाचा – नवऱ्यापासून लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, बॉयफ्रेंडचाही गंभीर आजाराने मृत्यू, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होती विचित्र अवस्था, आता करते ‘हे’ काम

या दोघांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघे पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकल्याच्या चर्चा करत आहेत. पण हे फोटो नक्की का काढण्यात आले आहेत याबद्दल मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विकी व अंकिता १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्नबंधनात अडकले. विकी हा उद्योगपती असून तो मुंबईमध्येच स्थायिक आहे. अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात दिसून आली होती. त्यानंतर ‘बागी २’ मध्येही रितेश देशमुखबरोबर दिसून आली होती. आता ती अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Tags: ankita lokhandebig bosscelebrity couplevicky jainviral photowedding photo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Mugdha Vaishampayan Story

नवऱ्यासह माहेरी पोहोचली मुग्धा वैशंपायन, अलिबागमध्ये कुटुंबियांबरोबर जेवण, धमाल-मस्ती अन्…; एकत्रित कुटुंबाचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.