गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते, रोजचे नवनवीन अपडेट शेअर करत दोघेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मुग्धा-प्रथमेशचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. दोघांच्या गायनाचे लाखो दिवाने चाहते आहेत. मुग्धा-प्रथमेशने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांच्या गायनाने प्रेक्षकांना वेड केलं आहे. (Mugdha Vaishampayan Story)
ही जोडी त्यांच्या लग्नानंतर विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ‘आमचं ठरलं’ म्हणत दोघांनी एकत्र एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्काही बसला. त्यांनतर दोघांच्या लग्नाच्या फोटो, व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मुग्धा व प्रथमेश यांनी डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत चिपळूण येथे त्यांच्या विवाहसोहळा उरकला. उपस्थित नातेवाईक, कलाकार मंडळी व कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुग्धाच्या लग्नाला तिच्या भावंडांनी बरीच धमाल, मस्ती केलेली पाहायला मिळाली.

मुग्धा व प्रथमेश लग्नानंतर कामाला लागले असले तरी त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ते एकमेकांना वेळ देत फिरताना दिसतात. नुकतेच दोघेही कोकणदौरा करताना दिसले. प्रथमेश हा कोकणातील आहे. त्यामुळे दोघेही त्यांच्या घरी जाऊन आले. त्यांनतर ते मुग्धाच्या घरी म्हणजेच अलिबागलाही गेले. मुग्धा नवऱ्यासह अलिबागला पोहोचली आहे. काल मुग्धाच्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त मुग्धाचे भावंडंही तिथे होते.
मुग्धाने तिच्या भावंडांबरोबर धमाल-मस्ती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. यांत मुग्धाची बहिणी मृदुलही पाहायला मिळत आहे. सध्या दोघी बहिणी माहेरी असून सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. याशिवाय मुग्धाने आंबोळी-बटाट्याची भाजी, सांभार-चटणी अशा साग्रसंगीत जेवणाचा आनंद घेतानाचाही फोटो पोस्ट केला आहे. मुग्धाचे हे माहेरच्या घरी धमाल करतानाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.