गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझंही नुकसान झालं”, कलाकारांना वेळेत न मिळणाऱ्या मानधनाबाबत अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली, “जेवढी स्क्रिप्ट महत्त्वाची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 6, 2026 | 11:17 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi artists payment delay

"माझंही नुकसान झालं", कलाकारांना वेळेत न मिळणाऱ्या मानधनाबाबत अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली, "जेवढी स्क्रिप्ट महत्त्वाची…"

Marathi artists payment delay : कलाकारांच्या थकलेल्या मानधनाबाबत आजकाल बरीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर या प्रकरणावर भाष्य करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शशांक केतकरने त्याच्या पाच वर्षांपासून थकलेल्या मानधनाबाबत पोस्ट शेअर करत आवाज उठविला. यापाठोपाठ आता आणखी एका मराठी अभिनेत्री, निर्मातीने मानधनाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. अभिनेत्री असताना न मिळणाऱ्या मानधनाबाबत आणि निर्माती असताना होणाऱ्या नुकसानाबाबत तिने स्पष्टपणे भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मनवा नाईक.

अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत मनवाने निर्माते आणि कलाकार यांच्या थकीत मानधनाबाबत भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “चॅनेल्स अगदी कॉर्पोरेट पद्धतीने काम करतात. कलाकारांच्याबरोबरच्या डील्स या ९० दिवसांच्याच असतात. यात खरंतर खूप प्रॉब्लेम आहेत. एक आहे, निर्मात्याची नियत पैसे द्यायचे आहेत की नाही. दुसरं म्हणजे, त्याचे प्रॉब्लेम्स. आपण केलेल्या प्लॅननुसार सगळं झालं आहे का?. तिसरं आहे, काही अचानक आलेले प्रसंगं, ज्यामुळे त्याने केलेल्या प्लॅन्सनुसार गोष्टी घडल्या नाहीत. चौथं म्हणजे जीएसटी, टीडीएस भरले की नाही. याबद्दल एका गोष्टीवरुन सांगू शकत नाही. यांत अनेक प्रॉब्लेम्स असतात. इंडस्ट्रीत असेही निर्माते आहेत, जे अगदी चोख व्यवहार करतात. वेळच्या वेळी पैसे देतात आणि यासाठी ते इंडस्ट्रीत जाणले जातात. मग यांना ९० दिवसांचा प्रॉब्लेम नसतो का?, माझं म्हणणं आहे की जेवढी स्क्रिप्ट (संहिता) महत्त्वाची आहे, तेवढीच एक्सल शीटसुद्धा महत्त्वाची आहे. पहिल्याच दिवशी एक्सल शीट नीट बनली नाही, तर ती कधीच बनत नाही. मग तोटा कसा भरुन काढायचा हा प्रश्न निर्माण होतो. माझ्याबरोबरसुद्धा हे झालं आहे, माझ्याही एक्सल शीट अनेकदा चुकल्या आहेत. पण हे एक सतत शिकण्याचं काम आहे”.

आणखी वाचा – ’क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या यशाचा जल्लोष, २५ करोड रुपयांचा गल्ला जमविला, भाग २ ची घोषणा केली आणि…

यानंतर मनवा म्हणाली, “मी निर्माती झाल्यानंतर राकेश सारंगने मला फोन करून सांगितलं होतं की, एकूण १०० रुपयांमधील आपले फक्त १० रुपयेच असतात. तेवढेच आपण घ्यायचे आणि उरलेले आपण द्यायचे असतात. हे माझ्या डोक्यात अगदी फिट बसलं आहे. तुमचे जेवढे पैसे आहेत, तेवढेच तुम्ही घ्या. समोरच्याला ९० दिवसांनी द्यायचे आहेत, त्यामुळे इथले पैसे तिथे द्यायचे. इथले तिथे द्यायचे… असं करायचं नाही. खूप प्रॉब्लेम असतात”.

आणखी वाचा – भरजरी साडी, पारंपरिक दागिने अन्…; ‘कोण होतीस तू…’ फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, पेशवाई लूकची चर्चा

शेवटी ती म्हणाली, “मी एकट्या निर्मात्यांना दोष देणार नाही. शो ऑन-एअर जाणार असतो. ठरलेल्या दिवसांमध्ये शूटिंग होत नाही. अनेकदा तारखांचे प्रॉब्लेम असतात. आज जे ठरवलं आहे, ते होत नाही. मग ते उद्यावर जातं. मग प्रत्येक गोष्टीची किंमत वाढते. असे काही ऐनवेळी येणारे प्रॉब्लेम्सदेखील असतात. यात कुठे निर्माता दबला जाईल, हे सांगता येत नाही. हे माझ्याबद्दलही झालं होतं. माझंही नुकसान झालं आहे. पण यातून बाहेर येण्याचा मार्ग काढणं महत्त्वाचं आहे”.

Tags: manva naikMarathi Artistspayemnt problem
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Gaurav Khanna Wife Gets Trolling

दोन अभिनेत्यांची जवळीक भोवली…; 'बिग बॉस' विजेता गौरव खन्नाच्या पत्नीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.