रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भरजरी साडी, पारंपरिक दागिने अन्…; ‘कोण होतीस तू…’ फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, पेशवाई लूकची चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 6, 2026 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sakshi Mahajan Wedding

'कोण होतीस तू...' फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ

Sakshi Mahajan Wedding : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचा माहोल पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ खिरीडने लग्नगाठ बांधली, तर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋत्विक तळवलकरदेखील विवाहबंधनात अडकला. अशातच आता या यादीत आणखी एका लोकप्रिय कलाकार जोडीचं नाव सामील झालं असून अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे यांनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या मालिकेमधील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री साक्षी महाजन नुकतीच अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्या हळदी आणि संगीत सोहळ्याचे खास क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानंतर आता साक्षी आणि अथर्व यांचा विवाहसोहळा देखील पार पडला आहे त्यांच्या लग्नाची चर्चा सध्या मराठी मनोरंजनविश्वात चांगलीच रंगली आहे. दोघांनीही साधेपणाला प्राधान्य देत, मात्र रॉयल आणि पारंपरिक अंदाजात हा खास दिवस साजरा केला.

आणखी वाचा – मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, पारंपरिक लग्नविधींना सुरुवात, फोटो समोर

साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांच्या लग्नातील लूकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. साक्षीने पांढऱ्या रंगाची भरजरी साडी, हिरवा चुडा आणि त्यासोबत गुलाबी शेला परिधान केला होता. तिचा पारंपरिक आणि एलिगंट लूक चाहत्यांना भावून गेला. तर अथर्व कर्वेने पेशवाई लूकमध्ये सर्वांची मनं जिंकली. दोघांच्याही लूकमध्ये साधेपणा असूनही रॉयल फील जाणवत होता. ज्यामुळे त्यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा सर्वत्र होत आहे. साक्षी आणि अथर्व यांच्या या नव्या प्रवासाला चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – “देवाच्या कृपेने वाचला…” गोविंदाला आल्या जीवे मारण्याच्या धमक्या, घरातील बंदुकीमुळे बचावला; मॅनेजरचा खुलासा

Tags: marathi actressmarathi entertainment newsSakshi Mahajan Wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
RCB Lifts Second WPL Trophy

"स्मृतीच्या आयुष्यात वादळ आलं पण…",आरसीबीच्या विजयानंतर स्मृतीसाठी प्रसिद्ध गायकाची पोस्ट, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.