Gaurav Khanna Wife Gets Trolling : ‘बिग बॉस हिंदी 19’ हा सिझन सुपरहिट ठरला होता. या सिझनचा विजेता गौरव खन्ना आजही चर्चेत आहे. गौरवसोबतच त्याची पत्नी आकांक्षा चमोला देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्यामुळे चर्चेचा विषय ठरत असते. कधी वैयक्तिक निर्णयांमुळे, तर कधी फॅशन सेन्समुळे आकांक्षाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान, आता आकांक्षा चमोला हिचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओवरून प्रेक्षकांनी तिला जोरदार ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय गौरव खन्नाच्या काही चाहत्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे.
आकांक्षा चमोला हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती दोन कलाकारांसोबत अतिशय जवळीक साधताना दिसते. व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती एका अभिनेत्रीबरोबर मजेशीर क्षण शेअर करताना दिसते, तर त्यानंतर दोन अभिनेत्यांसोबत रोमँटिक आणि कोजी अंदाजात नजर येते. या व्हिडीओतील आकांक्षाचे एक्सप्रेशन्स आणि तिचा आत्मविश्वास काही प्रेक्षकांना खटकला आहे. यामुळे गौरव खन्नाच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी, “फेमस होण्यासाठी काहीही करते” अशी टीका केली आहे, तर काहींनी “अशी वागणूक ठेवली तर गौरव लवकरच घटस्फोट देईल”, तर काही प्रेक्षकांनी “प्रमोशनसाठी एवढं करण्याची गरज नव्हती” अशी नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र, महत्त्वाच म्हणजे व्हायरल होणारा व्हिडीओ आकांक्षा चमोला हिच्या आगामी प्रोजेक्टचा भाग आहे. या प्रोजेक्टमध्ये ती अभिनेता कुंवर अमर आणि अली हसन यांच्यासोबत झळकणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नसून, पूर्णपणे व्यावसायिक कामाशी जोडलेला आहे. तरीदेखील, सोशल मीडियावर अपूर्ण माहिती आणि चुकीच्या समजुतींमुळे कलाकारांना वारंवार ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा – “स्मृतीच्या आयुष्यात वादळ आलं पण…”,आरसीबीच्या विजयानंतर स्मृतीसाठी प्रसिद्ध गायकाची पोस्ट, म्हणाले…





