अनेक मालिका येतात आणि जातात. काही मालिका संपल्यानंतर देखील प्रेक्षकांच्या मनात घरून करून राहतात. तर काही मालिका खूप कमी कालावधीत प्रेक्षकांचं मन जिंकतात.मालिकेचं यश हे मालिकेच्या कथानकावर आणि कलाकारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबुन असत. मालिकेमध्ये सुरुवाती पासूनच अनेक वळण दाखवत ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.(Priya Marathe Exit)
या मालिकेत प्रेक्षकांचे अनेक लाडके कलाकार पाहायला मिळतात.नायक, नायिका मालिकेत जितके महत्वाचे असतात. मालिकेची कथा पुढे जाण्यासाठी खलनायिका देखील तितकीच महत्वाची असते. या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे ही मोनिकाच्या भूमिकेतून खलनायिकेच्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली.तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
पाहा प्रिया का घेणार मालिकेचा निरोप? (Priya Marathe Exit)
सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे, आणि मोनिकाची यात महत्वाची भूमिका आहे, जेव्हा एखादा कलाकार एखादी भूमिका साकारतो तेव्हा प्रेक्षकांना देखील त्याच कलाकाराला त्या भूमिकेत पाहायची सवय होते. परंतु सध्या प्रिया तुझेच मी गीत गात या मालिके मधून प्रेक्षकांचा निरोप घेतो आहे, याबद्दलचा एक व्हिडिओ स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशिअल पेज वरून पोस्ट करण्यात आला आहे. यात प्रियाने स्वतः ती मालिका सोडत असल्याबद्दलचा खुलासा केला आहे.तबेतीच्या कारणामुळे प्रिया मोनिका म्हणून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.परंतु असे असले तरी प्रिया लवकरच नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, मोनिका म्हणून प्रेक्षक प्रियाला नक्कीच मिस करतील, पंरतु आता प्रियाच्या नव्या भूमिकेची देखील तितकीच उत्सुकता आहे.(Priya Marathe Exit)
प्रियाने मोनिका हे पात्र वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं,आणि आता ही जबाबदारी एक गुणी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी संभाळणर आहे या बदल तेजस्वीने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर तेजस्विनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मोनिका ही भूमिका तेजस्विनी कशी साकारते हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.त्याचसोबत तेजस्विनी अफलातून या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे देखील वाचा : साईशाची मालिकेतून EXIT चिंगीच्या भूमिकेत दिसणार ही बालकलाकार