प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सध्या कोणता शो सरस ठरला असेल तर तो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत एक वेगळी क्रेज या शोची बघायला मिळते. विनोदाचा दर्जा सांभाळण्यात या शोला विशेष यश आले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना तितकाच आवडतो.आणि या शो मुळे अनेक कलाकरांना ओळख मिळाली.(Hasyajatra America Daura)
विनोदाचं उत्तम टायमिंग, उत्तम लिखाण पडद्यामागे असलेलं बॉण्डिंग यांमुळे प्रत्येक स्किट मध्ये वेगळे पणा जपला जातो.अनेक कलाकारांची स्वतःची अशी एक स्टाईल निर्माण झाली आहे. प्रेक्षक या कलाकरांना आता त्या नावानेच जास्त ओळखतात.पंरतु सध्या हास्यजत्रा या शो ने काही काळ प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.त्यामुळे प्रेक्षक देखील शोला मिस करत आहेत.
हास्यजत्रेची टीम निघाली अमेरिका दौऱ्यावर (Hasyajatra America Daura)
परंतु हास्यजत्रेचा डोलारा आता मोठा झाला आहे. देश-विदेश पर्यंत हास्यजत्रा हा शो पोहचला आहे.हास्यजत्रेचे टीव्ही वर नवीन एपिसोड येत नसतील तरी शोचे दौरे जोरदार सुरु आहेत.नुकताच हास्यजत्रेच्या टीमचा नाशिक दौरा पार पाडला. आणि आता हायजत्रेची टीम अमेरिका आणि कॅनडा दौऱ्यावर निघाली आहे.अनेक कलाकारांनी या दौऱ्यावर जातानाचे फोटो पोस्ट केले आहेत.शिवालीची बहीण स्नेहा हिने स्टोरी पोस्ट करत सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत.तर शिवाली,वनिता,समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप स सर्वांनी या दौऱ्याचे फोटो पोस्ट करत आहेत. वनिताने सुमित सोबतचा भावुक फोटो देखील शेअर केला आहे.(Hasyajatra America Daura)

हास्यजत्रेचे हे देश-विदेश दौरे उत्तम पार पडत असले तरी लवकरच प्रेक्षक देखील नवीन एपिसोड्सची वाट बघत आहेत. हास्यजत्रा पुन्हा टीव्हीवर कधी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. या कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात, आणि छोट्या छोट्या गोष्टीं मधून ते प्रेम व्यक्त करत असतात.पंरतु आपले लाडके कलाकार आपला लाडका शो देश-विदेशात घेऊन चालेत याचा देखील प्रेक्षकांना तितकाच आनंद आहे.

हे देखील वाचा : ‘पॉर्न बघणाऱ्यांनी फॅमिली शो…’चाहत्याच्या कमेंटवर भडकला पृथ्वीक