मनोरंजन विश्वात अनेक कलाकार मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. या तिन्ही माध्यमांमध्ये सर्वाधिक पाहिलं जाणारं माध्यम म्हणजे मालिका.(Saisha Bhoir Exit)
विविध वाहिन्यांवरील विविध विषयांच्या मालिका आपापल्या पद्धतीने मनोरंजनाचा प्रयत्न करत असतात. अशातच एखादा कलाकार प्रेक्षकांच्या इतक्या पसंतीस पडतो की रोजच्या भागात आचानक तो दिसेनासा झाला की त्या विषया प्रती त्यांचा दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो.
सध्या झी मराठी वाहिनीवरील नवा गाडी नवं राज्य मालिकेतील प्रेक्षकांच्या लाडक्या एका कलाकाराने असाच अचानक मालिकेतून निरोप घेतलाय. नवा गडी नवं राज्य मालिकेतील बालकलाकार साईशा भोईर म्हणजेच सर्वांची लाडकी चिंगी आता मालिकेत दिसणार नाही. साईशाच्या जागी आता मुलगी झाली हो या मालिकेतून पुढे आलेली बालकलाकार आरोही सांबरे या मालिकेत आता चिंगीच्या भूमिकेत दिसणार आहे.

झी मराठीच्या इंस्टाग्राम वरून एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे त्या मधून ही गोष्ट समोर आली आहे. साईशाच्या आई बद्दल सर्वत्र सध्या अटकेच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे देखील हे पाऊल उचललं गेलं असल्याचं सांगितलं जातंय. आता मालिकेत आलेला या नवीन चिंगीला प्रेक्षक किती पसंती देतात आणि मालिकेत नक्की काय वळण येणार हे पाहून रंजक ठरणार आहे.
साईशाने या आधी रंग माझा वेगळा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होत. या मालिके नंतर साईशा नवा गडी नवं राज्य आणि चला हवा येऊ द्या लहान तोंडी मोठा घास या कार्यक्रमांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता साईशा कोणत्या नवीन भूमिकेत आणि कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.(Saisha Bhoir Exit)