रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२५ वर्षांनी ‘सरफरोश’ची टीम एकत्र आली अन्…; सुकन्या मोनेंनी रियुनियनचे फोटो केले शेअर, म्हणाल्या, “भारवून गेले आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 11, 2024 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sukanya Mone On Sarfarosh

२५ वर्षांनी 'सरफरोश'ची टीम एकत्र आली अन्…; सुकन्या मोनेंनी रियुनियनचे फोटो केले शेअर, म्हणाल्या, "भारवून गेले आणि…"

अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत सुकन्या यांचा खूप मोठा दबदबा आहे. सध्या त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. एकामागोमाग एक येणाऱ्या या चित्रपटांमुळे सुकन्या मोने सध्या चर्चेत असलेल्या पाहायला मिळत आहेत. मराठीसह सुकन्या यांनी हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली पाहायला मिळाली. सुकन्या मोने यांचा अभिनय असलेला ‘सरफरोश’ हा चित्रपटही विशेष गाजला. (Sukanya Mone On Sarfarosh)

जॉन मॅथ्यू मॅथन दिग्दर्शित ‘सरफरोश’ या चित्रपटाला नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९९साली प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ चित्रपटात अभिनेता आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शाह, मकरंद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, स्मिता जयकर, मनोज जोशी, आकाश खुराना, गोविंद नामदेव, अशोक लोखंडे, सुकन्या मोने ही कलाकार मंडळी दिसली. ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकतंच चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा – “चांगल्या मालिकेची माती केली आता…”, मालिका बंद करण्यावरुन बोलणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं चोख उत्तर, म्हणाल्या, “मालिकेवर १०० कुटुंब…”

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

यावेळी सुकन्या मोने यांनीदेखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली. जुन्या आठवणींना उजाळा देत सुकन्या यांनी खास कॅप्शन देत या रियुनियनचे फोटो शेअर केले आहेत. “कालचा दिवस खास होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडत होते. आपण एखादा सिनेमा करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो पण ‘सरफरोष’ हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे. आमिर खान माझा लाडका अभिनेता आहे आणि त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती. माझी आणि जॉन Mathew matthan ची पहिली भेट. दिल्लीतले चित्रीकरण. माझी, सोनालीची आणि स्मिता जयकरची झालेली घट्ट मैत्री. आम्ही केलेली धमाल. त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्या निमित्ताने झालेलं रियुनियन”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओद्वारे दिसली झलक, पूजाही करताना दिसली अन्…

पुढे त्या म्हणाल्या, “सगळ्या जुन्या आठवणी. शूटिंगदरम्यान झालेल्या गमती-जमती. इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी आणि आमिरचे मराठी बोलणं, त्याच्या वागण्यातला आपलेपणा, काळजी पुन्हा पहिली. मनोज जोशीची भेट झाली. जॉन आणि आभाचे अगत्याचे आमंत्रण. जॉनचा साधेपणा, त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा हे सर्व पाहून भारावून गेले होते. पुन्हा पुन्हा भेटत राहू”.

Tags: marathi actresssarafrosh moviesukanya moneSukanya Mone On Sarfarosh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

संजनाने अरुंधतीला काढलं घराबाहेर?, दोघींमध्ये वाद, अनिरुद्ध नेमकी कोणाची घेणार बाजू?, मालिकेत रंजक वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.