अभिनेत्री प्रिया बापट ही गेले अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. चित्रपट, मालिका, नाटक, वेब्सिरीज अशा प्रत्येक माध्यमात तिने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. वजनदार, आम्ही दोघी, मी शिवाजी राजेभोसले बोलतोय यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांत प्रिया मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली.
तसेच हॉटस्टार वरील सिटी ऑफ ड्रीम्स या हिंदी वेब्सिरीज मध्ये देखील प्रियाने महत्वाची भूमिका बजावली आहे.(Priya Bapat And Umesh Kamat)
प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील आवडत जोडपं आहे,त्यांचा समजूतदारपणा एकमेकांना मदत करणं हे त्यांच्या नात्यात पाहायला मिळत. टाइम प्लिज या चित्रपटात ते दोघे एकत्र पाहायला मिळाले होते. तसेच आणि काय हवं ही त्यांची वेब सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.या वेब्सिरीजचे आता पर्यंत तीन सीजन रिलीज झाले आहेत. या सिरीज मध्ये प्रिया आणि उमेश चा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालतो.
पहा काय आहे प्रिया बापटचं चॅलेंज (Priya Bapat And Umesh Kamat)
यासोबतचं प्रिया तिच्या सोशल मीडियावर ही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती अनेक ग्लॅमर्स, बोल्ड, ट्रेडिशनल फोटोशूट करत असते.तसेच प्रिया तिचे आणि उमेशचे देखील बरेच फोटोज,व्हिडिओ मजेशीर रील देखील शेअर करत असते. सध्या प्रियाने अँड यु कॅन स्पॉट माय साजनस रिफ्लेक्शन इन द ग्लास ऑफ माय सनग्लासेस असं कॅप्शन देत पर्पल रंगाच्या जॅकेट वरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सनग्लासेस देखील घातले आहेत . त्यामुळे तिचा तो लुक फार छान दिसतोय. परंतु तिने असं कॅप्शन देण्या मागे कारण हे आहे कि, तिच्या सनग्लासेस मध्ये उमेशचं प्रतिबिंब रिफ्लेक्ट होताना आपल्याला पहायला मिळत आहे.तिच्या या फोटोवर प्रेक्षकांच्या अनेक कमेंट देखील आल्या आहेत.(Priya Bapat And Umesh Kamat)
या सोबतच प्रिया आणि उमेश त्याच्या फिटनेस कडे विशेष लक्ष देतात. प्रिया तिचे अनेक वर्कआऊट चे व्हिडिओ फोटो देखील शेअर करत असते.तसेच प्रिया निर्माती म्हणून देखील काम करते. सध्या रंगभूमीवर दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक अगदी दणक्यात सुरु आहे. उमेश या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत तर प्रिया या नाटकाची निर्माती आहे. प्रिया आणि उमेशला एकत्र पहायला प्रेक्षकांना कायमच आवडते.