सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्याकडे पर्याय नव्हता…”, बॉलिवूड अभिनेत्रीने केलेलं हिंदू उद्योगपतीसोबत लग्न, करिअरच्या शिखरावर असताना अभिनय सोडला आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 24, 2026 | 9:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mumtaz On Interfaith Marriage

"माझ्याकडे पर्याय नव्हता…", बॉलिवूड अभिनेत्रीने केलेलं हिंदू उद्योगपतीसोबत लग्न, करिअरच्या शिखरावर असताना अभिनय सोडला आणि…

Mumtaz On Interfaith Marriage : ७०-८0 मध्ये मुमताज चित्रपटसृष्टीतील एक असे नाव होते, ज्यांनी एकापाठोपाठ अनेक चित्रपट दिले. तिची आणि राजेश खन्ना यांची जोडी पडद्यावर हिट ठरली. त्यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यासाठी ते आजही स्मरणात आहेत. मुमताजने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा पहिला हिट चित्रपट १९६७ मध्ये आला होता, ज्यामध्ये तिच्यासोबत दिलीप कुमार होते. त्याचे शीर्षक होते ‘राम और श्याम’. हा तिच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट होता पण लवकरच अशी वेळ आली जेव्हा तिने स्वतःला पडद्यापासून दूर केले. यावर मुमताजने वर्षांनंतर बोलले असून, त्यावेळी तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता असे सांगितले.

वास्तविक मुमताजने १९७४ मध्ये गुजराती हिंदू उद्योगपती मयूर माधवानीसोबत लग्न केले होते आणि चित्रपटांपासून दूर राहून ती लंडनमध्ये स्थायिक झाली होती. त्यांचा विवाह आंतरधर्मीय होता, त्यामुळे त्यावेळी त्याची बरीच चर्चा झाली होती. पण, या नात्याबाबत अभिनेत्री किंवा तिच्या कुटुंबीयांनाही काही हरकत नव्हती. अशा परिस्थितीत वर्षांनंतर अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना आणि आंतरधर्मीय विवाह नंतर इंडस्ट्री सोडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विक्की ललवानी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

आणखी वाचा – भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

विक्की लालवानीसोबतच्या संवादात मुमताज म्हणाली, “माझ्याकडे त्यावेळी कोणताही पर्याय नव्हता. माझी आई, आजी आणि काकूंनी हा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी घरच्यांना ओळखलं आणि मला अभिनय सोडायला सुचवलं”. मुमताज पुढे म्हणते, “आमच्या कुटुंबातील कोणीही हिंदू आणि मुस्लिमांकडे लक्ष दिले नाही. आम्ही कधीही धर्मात भेदभाव केला नाही. माझ्या बहिणीनेही हिंदू विवाह केला आहे”. गुजराती हिंदू व्यावसायिकासोबतच्या तिच्या लग्नाबद्दल मुमताज म्हणते, “माझं त्याच्यासोबतचं लग्न ठरलं होतं आणि मी माझ्या कुटुंबाच्या सल्ल्याचे पालन केले. मी पुराणमतवादी कुटुंबातून आले आहे – इराणी असेच आहेत”.

View this post on Instagram

A post shared by Mumtaz Actress (@mumtaztheactress)

यासोबतच लग्नानंतरच्या आयुष्याविषयी बोलताना मुमताज म्हणाली, “लग्नानंतर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधीही बदल करण्याची गरज पडली नाही. माधवानी घराण्याच्या संपत्तीबद्दल मला फुशारकी मारायची नाही, पण तिथे बरेच स्वयंपाकी होते. तेथे शाकाहारी आणि मांसाहारींसाठी स्वतंत्र भोजन तयार करण्यात आले. माझ्यावर कधीच मांसाहार सोडण्याचा दबाव नव्हता. माझे पती शाकाहारी आहेत. पण त्याने मला कधीच माझा आहार बदलण्यास सांगितले नाही”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

इतकंच नाही तर मुमताजने फिरोज खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितलं आणि जुने दिवस आठवत म्हणाली, “मी फिरोजला लग्नाआधी ओळखत होते. त्यावेळी त्याची इंग्लंडमध्ये एक मैत्रीण होती. आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि एकत्र कामही केले. अशा परिस्थितीत, अशी कोणतीही स्त्री नसेल जी त्याच्या प्रेमात पडणार नाही. तो खूप हँडसम होता”. अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की ते दोघेही मूळचे इराणी होते, त्यामुळेच ते एकमेकांशी जोडले गेले. मात्र, त्यांच्यात प्रेमसंबंध नसल्याची कबुलीही त्यांनी या संवादात दिली. मुमताजची मुलगी नताशा माधवानी हिचे लग्न फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानसोबत झाले आहे. दोघांनी २००५ साली लग्न केले. फिरोजच्या कुटुंबाबद्दल मुमताज सांगतात की, ते खूप प्रेमळ कुटुंब आहे आणि फिरोजची मुले खूप चांगली आहेत.

Tags: bollywood actressmumtazMumtaz On Interfaith Marriage
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
 Kajol breaks silence on breaking no kissing policy

"मला अस्वस्थ वाटतं", सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ३० वर्षांनी मोडली NO KISSING SCENE पॉलिसी, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.