बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मराठी पाऊल पडते पुढे’! पुरस्कार मिळताच प्रिया बापट भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “महाराष्ट्राला अभिमान वाटणं…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 16, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Priya Bapat expressed her happiness by sharing a special post on social media on receiving the marathi paul padte pudhe award

'मराठी पाऊल पडते पुढे'! पुरस्कार मिळताच प्रिया बापट भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “महाराष्ट्राला अभिमान वाटणं...”

मराठी मनोरंजन विश्वात ‘झी गौरव पुरस्कार’ हे कलाकारांसाठी कायमच विशेष राहिले आहेत. मराठी मनोरंजन सृष्टीत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांच्या कौतुकास्पद कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्याचे ‘झी चित्र गौरव’ व ‘झी नाट्य गौरव’ अशा दोन स्वरुपांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. ‘झी चित्र गौरव’ पुरस्कारामध्ये ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा एक मानाचा पुरस्कारही दिला जातो.

मराठीसह इतर भाषांत व माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्याला कलाकाराला हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. अशातच यंदाच्या वर्षी, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्कारावर अभिनेत्री प्रिया बापटने आपले नाव कोरलं आहे. मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्रिया बापटला यंदाचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार देण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

हा विशेष पुरस्कार मिळताच अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाने एक पोस्ट शेअर करत तिच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी तिने असं म्हटलं की, “आपल्या यशाचं कौतुक होत, पण तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाला शाबासकी मिळणं हे जास्त खास आहे. आपल्या कष्टांची, मेहनतीची दखल घेउन त्यातून मिळवलेल्या यशाबद्दल उभ्या महाराष्ट्राला अभिमान वाटणं हे खूप मानाचं आहे. आज ‘मराठी पाउल पडते पुढे’ हा पुरस्कार स्विकारकाना मन भरून आलं. अभिनेत्री म्हणून माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातले सगळे दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार या सर्वांना खूप खूप धन्यवाद”.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : ‘या’ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या तुमचा दिवस कसा असणार?

यापुढे प्रियाने तिच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींचे आभार मानत असे म्हटले आहे की, “मोठी झेप घेऊ पाहणाऱ्या, माझ्या पंखांना बळ देणाऱ्या आई-वडिलांना नमस्कार. माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास दाखवून मला नवं आकाश खुलं करून देणाऱ्या नागेश कुकनूर यांना मनःपूर्वक धन्यवाद. श्वेता तुला खूप खूप प्रेम. मुकुंद मेन्शन हा माझं कुटुंब आहे व कायम राहील आणि माझ्याबरोबर, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रेम करणारा ऊमेश तुलाही खूप खूप प्रेम आणि धन्यवाद!”

आणखी वाचा – “हा धक्का कोणालाच पचला नाही पण…”, ‘आई कुठे…’च्या कथेबाबात विचारताच अरुंधतीचं थेट उत्तर, म्हणाली, “इतकी नकारात्मकता…”

प्रियाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच तिला शुभेच्छादेखील दिल्या आहेत. अमृता खानविलकर, राहुल देशपांडे, आरती मोरे, पल्लवी पाटील, सलील कुलकर्णी, क्षितिज पटवर्धन, पूर्वा कौशिक, अभय महाजन, नंदिता पाटकर, सिद्धार्थ मेनन, यांसह अनेकांनी कमेंट्सद्वारे तिचे अभिनंदन केलं आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newspriya bapat
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
amitabh bachchan update

Video: अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत, प्रकृतीबाबत स्वतःच केला खुलासा, म्हणाले, "हे सर्व खोटं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.