ओटीटी वापरकर्त्यांसाठी येता आठवडा हा खूपच खास असणार आहे. येत्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. येत्या आठवड्यात ओटीटीवर मनोज वाजपेयी, राजपाल यादव व यामी गौतमचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात ओटीटी वापरकर्त्यांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी असणार आहे. चला तर जाणून घेऊयात येत्या आठवड्यात प्रदर्शित होणारे हे बहुचर्चित चित्रपट कोणते?
सायलेन्स २ : मनोज वाजपेयी यांच्या ‘सायलेन्स’ चित्रपटाचा दुसरा भाग येत्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात मनोज बाजपेयी यांनी एसीपी अविनाश वर्मा यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या १६ एप्रिल रोजी झी-०५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता वकार शेखदेखील आहे, ज्याने ‘अनुपमा’ या टीव्ही मालिकेत यशदीपची भूमिका साकारली होती. अबन भरुचा देवहंसचा चित्रपट, सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआउट, मनोज बाजपेयी एसीपी अविनाश वर्माच्या भूमिकेत आहेत. प्राची देसाईने इन्स्पेक्टर संजना भाटियाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये साहिल वैद, पारुल गुलाटी, वकार शेख, अंकित भारद्वाज आदींचाही समावेश आहे.
काम चालू है : राजपाल यादवचा प्रसिद्ध चित्रपट ‘काम चलू है’ देखील येत्या आठडव्यात १९ एप्रिल रोजी झी-०५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजपाल यादव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्या मुलीला गमावतो, ज्याच्या विरोधात तो प्रशासनाशी लढतो आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम करतो. चित्रपटात राजपाल यादव यांच्याबरोबर जिया मानेक आणि कुरंगी नागराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पलाश मुच्छाळ यांनी केले आहे.
आर्टिकल ३७० : यामी गौतमचा चित्रपट ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास यांनी केले आहे. ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केला असून, त्यात प्रियामणी, अरुण गोविल, वैभव तत्त्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडीज, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षे मायदेव हे इतर कलाकार आहेत.