शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Premachi Goshta Serial : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कार्तिक करणार मुक्तावर जबरदस्ती, सत्य समोर येणार का?, पुढे काय घडणार?

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 11, 2024 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Premachi Goshta Serial Update

Premachi Goshta Serial Update

प्रेक्षकांच्या दररोजच्या जीवनात एक महत्वाचा घटक ठरल्या आहेत त्या म्हणजे रोज विविध विषय मांडणाऱ्या मालिका. मनोरंजनाचं एक महत्त्वाच साधन म्हणजे मालिका. अनेक वेगवेगळ्या विषयाच्या मालिका सध्या प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करत असतात. मालिकांच्या या शर्यतीत आघाडीवर असलेली एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’. ‘होणार सून मी या घरची’, ‘अग बाई सासूबाई’ या मालिकांमधून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधानने या मालिकेतून पुनरागमन करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या रंजक वळणावर असल्याच पाहायला मिळतय. (Premachi Goshta Serial Update)

मालिकेत मुक्ता-सागरच नव्याने फुलणारी प्रेमकहानी पाहणं प्रेक्षक पसंत करत आहेत. परंतु मुक्त-संगरच्या नात्यात सध्या दुरावा आलं आहे आणि तो हा दुरावा संपवण्यासाठी सागरचे चांगलेच प्रयत्न देखील सुरू आहेत. अशातच मालिकेच्या एका नव्यय प्रोमोने प्रेक्षकांच लक्ष वेधल आहे. मालिकेच्या प्रोमोनुसार सागरच्या घरात अंधाराचा फायदा घेत कार्तिक मुक्ताला मिठी मारतो आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर मुक्ता आरडाओरड करते आणि सगळे तिथे जमा होतात. त्याआधी कार्तिक मुक्ताची माफी मागतो आणि मी स्वातीला देखील असेच सरप्राइज देतो असे म्हणतो. तेवढ्यात स्वाती तिथे येते पण मुक्ता याबद्दल तिला काहीही सांगत नाही.

आणखी वाचा- ‘आठवी अ’ला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर मराठीत नव्या वेबसीरिजची घोषणा, ‘रस्त्यावरची शाळा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुक्ताचा राग होणार का शांत?
दुसरीकडे मुक्ताचा राग शांत करण्यासाठी सागरचे अतोनात प्रयत्न चालू आहेत. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये सागर नोकराच्या वेशात जातो पण सागरच भिंग फुटतं आणि मुक्ता पुन्हा सागरवर रागावते. मुक्ता सागरला म्हणते “तु्म्हाला हा सगळा भावनांचा खेळ वाटतो का, एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडणं कठीण असते”. तर दुसरीकडे इंद्रा देखील मुक्तावर चिडलेली पाहायला मिळते.(Premachi Goshta Serial Update )

आणखी वाचा- IPL 2024 : लखनऊच्या जर्सीमध्ये दिसणार रोहित शर्मा?, लखनऊ सुपर जाईंट्सच्या प्रशिक्षकांच मोठं विधान, म्हणाले, “रोहित शर्मा सारखा दिग्गज…”

इंद्रा देणार मुक्ताला शिक्षा?
घरात इंद्रा सर्वांसाठी मांसाहारी जेवण बनवते पण मुक्तासाठी कोणताही शाकाहारी पदार्थ बनवला जात नाही. यावरून सागर चिडतो आणि “मुक्तासाठी एखादी भाजी बनवायला हवी होती. एखाद्याला उपाशी का ठेवायचं” असं मानतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर घरातील सगळे देखील इंद्राच्या या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. सागर मुक्ताला जेवण्याची विनंती करतो पण मुक्ताची नाराजी काही दूर होत नाही तेव्हा सई मुक्तासाठी शेजारच्या काकूंकडून शाखाहरी जेवण घेऊन येते आणि मुक्ताला जेवण्याचा आग्र्ह करते.
आता मालिकेत पुढे कोणतं रंजक वळण येणार? मुक्ता सागर यांच्यामधील हा दुरावा संपणार का? ही पाहून रंजक ठरणार आहे.

Tags: premachi goshtatejashree pradhanप्रेमाची गोष्ट
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Atharva Ruke Content creator’s Don Aunty and Khala Chachi videos going viral on social media

सामान्य कुटुंबातून आलेल्या अथर्व रुकेची सोशल मीडियावर हवा, 'डॉन आंटी'च्या व्हिडीओवर सेलिब्रिटीही फिदा, म्हणाले, "भावा कडक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.