Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक शो जिंकण्यासाठी आता खूप प्रयत्न करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अरबाज पटेल नवीन कॅप्टन झाला आहे. अरबाज शोमध्ये टास्क जिंकून कॅप्टन बनला. अरबाज कॅप्टन बनला असला, तरी या शोमध्ये सध्या चर्चा ही सूरजची होताना दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की, जान्हवी, अरबाज आणि धनःश्याम यांना हरवण्याचा दमदार प्रयत्न सूरजनं केला होता. आता अनेकजण सोशल मीडियावर सूरजचं कौतुक करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये सूरजला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाण हा जान्हवी, निक्की, अरबाज आणि धनःश्याम यांच्या विरुद्ध होता. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
या टास्कमध्ये सूरजनं त्याच्यावर दादागिरी करणाऱ्या वैभव चव्हाणलादेखील त्यानं गप्प केलं. कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज हा एकटाच भिडला होता. आतापर्यंत सूरजला प्रेक्षकांचा पाठिंबा होता. मात्र त्याचं कौतुक सेलिब्रिटींनीही केली आहे. सूरज चव्हाणचं कौतुक करताना अभिनेता पुष्कर जोग, जय दुधाणे, निर्माते संदीप सिकंद आणि उत्कर्ष शिंदे यांनी त्याला आता सोशल मीडियाच्या माध्यामातून पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर अनेकजण सूरज विजयी होणार असल्याचा भाकीत करताना दिसत आहेत. अशातच टीम Aमध्ये सूरजविषयीची दहशत निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस’च्या आजच्या भागात अरबाज, वैभव, निक्की व जान्हवी पॅडी व सूरज यांच्याविषयी गेमप्लॅन करणार आहेत, यावेळी यावेळी अरबाज निक्की, जान्हवी, घन:श्याम व वैभव यांना “पॅडीदादा पुढे जाऊन आपल्याला भारी पडणार मी बोललो होतो आणि आता तसंच होत आहे. ते स्वत:चा गेम खेळत आहेत”. यापुढे तो असं म्हणतो की, “सूरज आणि पॅडी आपल्याला पुढे जाऊन भारी पडणार आहे आणि तेच झालं”. यावर निक्की त्याला असं म्हणते की, “तुम्ही त्या टीमला असं बोलू नका की, ते भारी पडत आहेत, नाही तर ते आपले पॉईंट्स पकडतील”.
तसंच या संभाषणादरम्यान, वैभव असं म्हणतो की, “आपण अभिजीतला मास्टरमाइंड नाही असं म्हटलं. पण पॅडीदादा सगळं गेम खेळतायत”. त्यामुळे आता पॅडी व सूरज हे टीम A वर भारी पडत असल्याचे चित्र दिसत असतानाच अरबाज, निक्की व वैभव हे सतर्क झाले आहेत. त्यामुळे आता A टीम त्यांचा खेळ सुधारत सूरज व पॅडी यांना शांत करणार का? की गेल्या दोन आठवड्यांपासून शांत असलेले सूरज व पॅडी टीम A ला पुरुन उरणार? हे आगामी भागांतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.