शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सहकलाकार, सहकारी तुमचा…”, ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरला कोणाशीच करायची नाही मैत्री, म्हणाली, “तुमचा कुणीही मित्र…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2024 | 2:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Premachi goshta serial fame actress apurva nemlekar shared reality check post on Instagram story

"सहकलाकार, सहकारी तुमचा...", 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरला कोणाशीच करायची नाही मैत्री, म्हणाली, "तुमचा कुणीही मित्र..."

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ सारखी मालिका किंवा ‘बिग बॉस मराठी’ ४ मध्ये खेळलेल्या विविध टास्कद्वारे स्वतःचं वैशिष्ट्य दाखवून दिलं आहे. अपूर्वानं मालिकांमध्ये काम करत तिनं प्रेक्षकांच्या मनावर खास स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Apurva Nemlekar On Instagram)

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील पसंती मिळते. अशातच अभिनेत्रीने केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हॅशटॅग ‘रियालिटी चेक’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे आणि अपूर्वाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

आणखी वाचा – Video : ‘तू चाल पुढं’च्या शेवटच्या दिवशी मालिकेतील कलाकारांना रडू कोसळलं, सेटच्या पाया पडले अन्…; भावुक व्हिडीओ व्हायरल

अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असे म्हटले आहे की, “२०२४ या वर्षात मी हे निश्चित केले आहे की, सहकारी, वर्गमित्र, सहकलाकार, शेजारी, ग्राहक किंवा तुमच्या ओळखीचा कुणीही माणूस यांपैकी कुणीही तुमचा मित्र नाही.” अपूर्वा नेहमीच तिच्या सोशल मीडियाद्वारे काहीना काही शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – Video : लेकीचं लग्न सुरु असताना आमिर खानच्या डोळ्यात पाणी, आयरा खानला पाहताना गहिवरुन आलं अन्…; भावुक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळी नेहमीच आपले विचार वा मत मांडत असतात. अभिनेत्री अपूर्वाही सोशल मीडियावर नेहमीच काहीना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेली ही पोस्ट नक्की कुणासाठी आहे? किंवा कुणासंदर्भात आहे, याबद्दल तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

Tags: apurva nemkekar premachi goshtaapurva nemlekarentertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsअपूर्वा नेमळेकरमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "मीही याच गोष्टींचा सामना केला", आयेशा खान तिच्या रिलेशनशिपबाबत बोलताना अंकिता लोखंडे भलतंच बोलली, म्हणाली, "मला कळतं की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.