शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमाची गोष्ट’मधून अचानक एक्झिट घेतल्यानंतर तेजश्री प्रधानची निराशाजनक पोस्ट, म्हणाली, “तुम्ही योग्य किंमत व आदर…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2025 | 4:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
premachi gosht serial Actress Tejashri Pradhan exit audience express displeasure on social media.

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तेजश्री प्रधानची एक्झिट, प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त

स्टार प्रवाहवरील टीआरपीच्या शर्यतीत कायम अग्रेसर असणारी मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका. या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, योगेश केळकर सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेच्या प्रत्येक नवीन अपडेट्सची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. मात्र आता या मालिकेबद्दलची एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत कायमच अग्रस्थानी राहिलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून मुख्य अभिनेत्री तेजश्री प्रधानने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसह मालिकेच्या प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.  (tejashri pradhan premachi gosht exit)

मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना आणि टीआरपीमध्येही मालिका हिट होत असताना तेजश्रीने अचानक मालिका का सोडली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तेजश्रीने मालिका सोडल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप अद्याप समोर आलेली नाही. पण तिच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले आहेत. या सगळ्या चर्चांमध्ये तेजश्रीच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टखाली तिने “कधीकधी तुम्हाला बाहेर पडावे लागते. तुमची योग्य किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते कोणीही करणार नाही” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

आणखी वाचा – आभ्याच्या बोलण्यामुळे रेश्मा नाराज, केवडाप्रती असलेलं प्रेम पाहवेना, नात्याला कोणतं नवं वळण मिळणार?

मालिका सोडण्याबद्दल तेजश्रीने अधिकृत भाष्य केलं नसलं तरी तिच्या या मताशी अनेकांनी संमती दर्शवली आहे. याबद्दल त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत आणि या स्टोरी तेजश्रीने रीशेअर केल्या आहेत. यामध्ये चाहत्यांनी “आजचा शहाणपणाचा निर्णय उद्याला चांगला आकार देतो”, “हे स्वीकारणे कठीण आहे. पण तू अधिक चांगल्यासाठी पात्र आहेस पुढे जा”, “तेजश्री तू एक प्रतिभावान आणि हुशार अभिनेत्री आहेस. त्यामुळे तू अधिक चांगल्यासाठी पात्र आहेस. तू ज्याप्रकारे मुक्ता साकारली आहेस, त्यामुळे या पात्राला वेगळी ऊंची मिळाली आहे. पुढे नक्कीच नवीन प्रोजेक्ट मधुन भेटायला येशील. पण तुझी कमी कायम भासत राहील. तू आमची आवडती अभिनेत्री आहेस”.

आणखी वाचा – अधिपती-अक्षरामध्ये पुन्हा एकदा दुरावा आणण्यासाठी भुवनेश्वरी यशस्वी, दोघांचा संसार मोडण्यासाठी प्रयत्न, मोठा ट्विस्ट

तेजश्रीने मालिका सोडल्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी मालिका का सोडली? यामागचं कारण विचारलं आहे. तर काहींनी तेजश्रीने घेतलेल्या निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये तेजश्रीने मुक्ताची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. जान्हवी व शुभ्राप्रमाणे तेजश्रीने साकारलेली मुक्ता ही भूमिकादेखील घराघरांत प्रसिद्ध झाली. पण, आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री दिसणार नाही.

Tags: tejashree pradhan premachi gosht exittejashri pradhantejashri pradhan premachi gosht exit
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bigg Boss 18 show winner name revealed before the grand finale

Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.