‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका जवळपास गेली दोन वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मालिकेत सध्या अक्षरा आणि अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून अधिपती अक्षराला घर सोडून जाण्याचा सल्ला देतो. अक्षरा सुद्धा काहीही आक्षेप न घेता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते. त्यानंतर मालिकेत अक्षराच्या गरोदर असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अक्षराला घराबाहेर काढल्यावर भुवनेश्वरी आणि तिची बहीण दुर्गेश्वरी या दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (tula shikvin changlach dhada serial update)
मालिकेत एकीकडे अक्षरा आई होणार आहे, तर दुसरीकडे त्यांचा अबोलाही पाहायला मिळत आहे. अक्षरा अधिपतीच्या संवाद साधण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण अधिपतीशी तिचा काहीही संवाद होत नाहीये. अक्षराने अधिपतीच्या मोबाइलवर फोन करण्याचा प्रयत्न करते आहे. पण अधिपतीपर्यंत तिचा फोन पोहोचू शकत नाही. दोघांमधील या चुकीच्या संवादामुळे दोघांमधील गैरसमज आणखीनच वाढत आहेत. त्यात आता भुवनेश्वरीही दोघांच्या संसारात मीठाचा खडा टाकणार आहे. याचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्यात भुवनेश्वरी अक्षराविरुद्ध अधिपतीचे कान भरताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीची तयारी करत आहे पूजा सावंत, खास दागिन्यांनी वेधलं लक्ष, व्हिडीओ समोर
या प्रोमोमध्ये भुवणेश्वरी अधिपताला असं म्हणते की, “आम्ही तुमच्यावर जसं प्रेम केलं तसं सूनबाईंवर सुद्धा खूप प्रेम केलं. पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलच नाही”. तर दुसरीकडे अक्षराची मैत्रीण तिला अधिपतीची भेट होण्यासाठी घेऊन गेली होती. पण अधिपती तिथे न आल्याबद्दल सांगते. अधिपती आता येणारच नाहीत असं ती अक्षराला म्हणते. यानंतर भुवनेश्वरी अधिपतीच्या मागे अक्षराबद्दल असं म्हणते की, “आज आम्ही तुमची भेट होऊ दिली नाही. लवकरच तुमचं लग्नही मोडू”.
आणखी वाचा – लग्न करुन आई होण्याचं अनन्या पांडेचं स्वप्न, लवकरच थाटणार संसार, म्हणाली, “लग्न करुन मला…”
त्यामुळे आता अधिपती-अक्षरा यांची भेट घडवून आणण्यात भुवनेश्वरी पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे. भेट न घडवून आणण्यात भुवनेश्वरी यशस्वी झाल्यानंतर आता ती दोघांचे लग्नही मोडणार आहे. त्यामुळे आता भुवणेश्वरीचा हा डाव यशस्वी होणार का? अधिपती-अक्षरा यांच्यातील नाते पुन्हा सुधरणार का? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसंच दोघे आपापसातील मतभेद, भांडण विसरुन पुन्हा एकत्र येणार का? याचीही अनेक प्रेक्षक वाट बघत आहेत.