गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर एका सीरिजची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि ही सीरिज आहे ‘इट्स मज्जा’ची ‘दहावी-अ’ ही सीरिज. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर ही सीरिज ६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शाळेतील दहावीच्या वर्षात घालवलेल्या प्रत्येक खास आठवणींची शिदोरी घेऊन अनेकजण आपल्या एका नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व ‘दहावी-अ’ सीरिजमधून पाहता येणार आहे. या सीरिजचा नुकताच पहिला भाग (सोमवार ०६ जानेवारी) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. (Dahavi-A Series 2nd episode update)
या पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. पुढे शाळेत आलेल्या नवीन इंग्रजीच्या शिक्षिकेबद्दल हे मित्र संवाद साधतात. त्यानंतर आभ्या आईकडे सायकलची मागणी करतो. मात्र त्याची आई त्याला कामात मदत करण्यावरुन बोलते. त्यानंतर त्याची आई त्याला गावात कोणती तरी जुनी सायकल असल्यास बघ असं म्हणते. रेश्मा व पल्लवीची आई रेश्माला त्यांच्या लग्नाविषयी सांगतात. रेश्मा व पल्लवीची आई रेश्माला दहावी होताच रेश्माचं लग्न लावणार असल्याचे म्हणतात. यामुळे रेश्मा काहीशी नाराज होते. त्यानंतर विक्या त्याच्या वडिलांकडे पैसे मागतो.
आणखी वाचा – लग्न करुन आई होण्याचं अनन्या पांडेचं स्वप्न, लवकरच थाटणार संसार, म्हणाली, “लग्न करुन मला…”
पुढे शाळेत पोहोचताच रेश्मा आभ्याकडे त्याची इंग्रजीची वही मागते आणि आभ्याही तिला वही देतो. तेवढ्यात त्याला कळतं की, केवडाला सुद्धा त्याच्या वहीची गरज आहे. त्यामुळे तो रेश्माला तिचं वहीचं काम झाल्यानंतर ती वही केवडाला देण्यास सांगतो. त्यानंतर रेश्मा आभ्याची वही केवडाला देते. पुढे सागऱ्या आभ्या व त्याच्या मित्रांना दहावी अ या वर्गात आल्यावरुन चिडवतो. यादरम्यान त्यांची एकमेकांबरोबर नौकझोक होते. यावेळी मध्या सागऱ्याचा चांगलाच अपमानही करतो.
त्यामुळे आता सागऱ्या त्याच्या या अपमानाचा बदला कसा घेणार? पुन्हा आभ्या, मध्या, किरण्या व विक्या यांच्यात आणि सागऱ्यामध्ये वाद होणार का? तसंच दुखावलेल्या रेश्माचे मन आभ्या समजू शकेल का? आणि केवडा व आभ्या यांच्या नात्यात आणखी काय नवीन वळण येणार? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर आभ्या, विक्या, किरण्या, मध्या, रेश्मा व केवडा यांच्या आयुष्यात या ‘दहावी-अ’ या वर्षात काय नवीन बदल होणार? हेही लवकरच पाहायला मिळेल.