छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’चा अठरावा सीझन गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तीन माहिने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सलमान खानने नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये शोच्या ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली. येत्या १९ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १८’चा ग्रँड फिनाले सोहळा पार पडणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर अखेर आता पुढच्या दोन आठवड्यांत प्रेक्षकांना या शोचा विजेता मिळणार आहे. (bigg boss 18 grand finale)
या शोमध्ये विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, रजत दलाल, चुम दरंग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडे सारखे स्टार्स दिसत आहेत. या शोची बरीच चर्चा आहे. शोच्या विजेत्याबद्दल चाहत्यांनाही उत्सुकता आहे. प्रत्येकाला आपापल्या स्पर्धकाला विजेता बनताना पाहायचे आहे. त्यामुळे अनेक चाहते मंडळी या ग्रँड फिनालेसाठी उत्सुक आहेत. अशातच समीक्षक कमाल आर खान (केआरके) यांनीही ग्रँड फिनालेबाबत एक पोस्ट केली आहे. यामधुन शोचा विजेता कोण असेल? हे सांगितले आहे.
I am really surprised that #BiggBoss contestants are not sure till now that (1) Vivian or (2) Karanveer will win the trophy.🏆 @ColorsTV
— KRK (@kamaalrkhan) January 7, 2025
त्याने शेअर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मला खरोखर आश्चर्य वाटते की, बिग बॉस स्पर्धकांना (०१) विवियन किंवा (०२) करणवीर ट्रॉफी जिंकेल याची अद्याप खात्री नाही”. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘बिग बॉस १८ च्या टॉप स्पर्धकांबद्दल सांगायचे तर, या यादीत विवियन डिसेना पहिल्या स्थानावर आहे. करण वीर मेहरा दुसऱ्या स्थानावर, तर शिल्पा शिरोडकर तिसऱ्या स्थानावर आहे. कारण ब्रँड केआरकेने ते सांगितले आहे”.
आणखी वाचा – आभ्याच्या बोलण्यामुळे रेश्मा नाराज, केवडाप्रती असलेलं प्रेम पाहवेना, नात्याला कोणतं नवं वळण मिळणार?
दरम्यान, Ormax मीडियाच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात रजत दलाल यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर विवियन डिसेनाला क्रमांक दोन आणि करणवीर मेहराला तिसरा क्रमांक मिळाला आहे. आता ‘बिग बॉस १८’चा विजेता कोण होणार? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना १९ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जिओ सिनेमा आणि कलर्स टीव्हीवर शोचा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना पाहता येणार आहे.