शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सख्ख्या भावाच्या निधनानंतर स्वतःला अजूनही सावरु शकली नाही अपूर्वा नेमळेकर, घटनेला वर्ष झाल्यानंतर म्हणाली, “तुझ्या अपेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 15, 2024 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Apurva nemalekar emotional post

सख्ख्या भावाच्या निधनानंतर स्वतःला अजूनही सावरु शकली नाही अपूर्वा नेमळेकर, घटनेला वर्ष झाल्यानंतर म्हणाली, "तुझ्या अपेक्षा..."

लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतलं जातं. सोशल मीडियावरही या अभिनेत्रीचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. ही अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. मालिकाविश्वात अपूर्वाने महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सध्या अपूर्वा ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून सावनी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. अपूर्वाला ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत पोहोचली. (Apurva nemalekar emotional post)

अभिनयाशिवाय अपूर्वा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन ती नेहमीच ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसह शेअरही करते. अशातच अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या भावुक पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अपूर्वाने ही पोस्ट तिच्या भावासाठी केली आहे. गेल्या वर्षी अपूर्वाच्या भावाचं निधन झालं. त्याच्या आठवणीत अपूर्वाने भावुक होत ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : तुम्ही वापरत असलेली नेलपॉलिश फॅक्ट्रीमध्ये कशी तयार करतात?, समोर आला संपूर्ण व्हिडीओ, इतकं कठीण आहे काम

यावेळी अपूर्वाने तिच्या भावाबरोबरचा फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असे म्हटलं की, “भाऊ तू मला खंबीर राहायला शिकवलं आहेस पण मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही आहे. तू या जगात नाही आहेस याचा स्वीकार करण्याइतकी मी खंबीर नाही. तुला जाऊन एक वर्ष झालं पण असा एकही दिवस गेला नाही की, मला तुझी आठवण आली नाही. भाई आय मिस यु आय लव यू”, असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट केली आहे. अपूर्वाच्या भावाचं गेल्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ओमकारने वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ओमकारच्या निधनानंतर अपूर्वा आणि तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सोशल मीडियावरुन तिने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली होती.

आणखी वाचा – ‘पारु’ मालिकेमधून ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची एक्झिट, सोशल मीडियाद्वारे शेअर केली पोस्ट, म्हणाला, “तिला फार त्रास दिला पण…”

सध्या अपूर्वा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून सावनी या नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहे. या भूमिकेतून ती प्रेक्षकांची मन जिंकत आहे.

Tags: Apurva nemalekar brother deathapurva nemlekarapurva nemlekar gets emotionalmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
रामनवमीला राशीनुसार करा 'या' मंत्राचा जप, अशाप्रकारे करा श्रीराम यांची पूजा, तुम्हाला आयुष्यामध्ये जाणवतील सकारात्मक बदल

रामनवमीला राशीनुसार करा 'या' मंत्राचा जप, अशाप्रकारे करा श्रीराम यांची पूजा, तुम्हाला आयुष्यामध्ये जाणवतील सकारात्मक बदल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.