रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारु’ मालिकेमधून ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची एक्झिट, सोशल मीडियाद्वारे शेअर केली पोस्ट, म्हणाला, “तिला फार त्रास दिला पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 15, 2024 | 4:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sachin deshpande on sharayu sonavane

'पारु' मालिकेमधून 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याची एक्झिट, सोशल मीडियाद्वारे शेअर केली पोस्ट, म्हणाला, "तिला फार त्रास दिला पण…"

‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिकांना प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या पारू या मालिकेचा प्रवासही उत्तम सुरु असलेला पाहायला मिळत आहे. ‘पारू’ मालिकेच्या कथानकाने आणि मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सध्या मालिकेत पारूचा ब्रँड अँबेसेडर होण्याचा प्रवास पाहायला मिळत आहे. तर एकीकडे पारूच्या लग्नाची लगीन घाई सुरु असताना त्यात खूप मोठं विघ्न आलेलं पाहायला मिळत आहे. पारूच्या वडिलांच्या ओळखीने त्यांनी पारुसाठी एक स्थळ आणलेलं असतं. (Sachin deshpande on sharayu sonavane)

पारुसाठी आणलेलं हे स्थळ म्हणजे दिशा व दामिनीने आखेलला डाव असतो. मालिकेत पारूच्या होणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेत अजय म्हणजेच सचिन देशपांडेला पाहणं रंजक ठरत आहे. याआधीही सचिनने बऱ्याच मालिकांमधून नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. अशातच काही दिवसांपूर्वी सचिनने पारू मालिकेत पदार्पण केलं मात्र आता सचिनची ही भूमिका मालिकेचा निरोप घेणार असल्याचं एका पोस्टवरुन समोर आलं आहे.

आणखी वाचा – आदित्यने अजयच्या तावडीतून पारूची केली सुटका, सुखरुप घरी आणल्यानंतर अहिल्यादेवी भेटीला, दोघींमध्ये नेमकं काय बोलणं होणार?

View this post on Instagram

A post shared by Sachin Deshpande (@sachin_deshpande)

सचिनने ही पोस्ट खास शरयू सोनावणे म्हणजेच पारूसाठी लिहिली आहे. सुरुवातीला चांगलं रूप घेऊन आलेला अजय मात्र कालांतराने त्याचा खरा चेहरा मालिकेत दाखवतो आणि पारूला त्रास देताना दिसतो. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षकही अजयवर नाराज असलेले पाहायला मिळाले. मात्र अजय हा खरा आयुष्यात उत्तम माणूस असून त्याने ऑन स्क्रीन पारुला झालेल्या दुःखामुळे तिच्यासाठी खास पोस्ट लिहत तिची माफी मागितली आहे.

आणखी वाचा – संजनाला अरुंधतीकडून सक्त ताकीद, मनूच्या एन्ट्रीने प्रेक्षकांची नाराजी, प्रोमो पाहून म्हणाले, “हिच्यामुळे आशुतोष गेला आणि…”

पारूबरोबर चा फोटो शेअर करत सचिनने असं म्हटलं आहे की, “गेला दीड आठवडा मी या गोड मुलीला ऑनस्क्रीन फार त्रास दिला. पण ऑफस्क्रिन आम्ही खुप छान मित्र झालो, तसं काम फार दिवसांच नव्हतं, पण जे काही उपद्व्याप करायचे होते त्यासाठी शरयूने कम्फर्टेबल असणं फार गरजेचं होतं, पण उलट तिनेच मला कम्फर्टेबल केलं. शरयू बघ मी तुझ्याबद्दल सगळं चांगल बोललो आहे. आता तरी लुडोमध्ये चीटिंग करु नकोस. आता नवीन काम, नवीन भूमिका घेऊन लवकरच तुमच्या समोर येतो. सगळ्यांना खूप प्रेम”. सचिनच्या या पोस्टवर शरयू म्हणजेच पारूनेही कमेंट केली आहे. शरयू म्हणाली आहे की, “तू चांगलाच आहेस डूचकांडे. आणि मी लुडो न चीटिंग करता खेळले आहे”, असं म्हटलं आहे.

Tags: marathi serialpaaru serialSachin deshpande on sharayu sonavanezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
making of nail paint

Video : तुम्ही वापरत असलेली नेलपॉलिश फॅक्ट्रीमध्ये कशी तयार करतात?, समोर आला संपूर्ण व्हिडीओ, इतकं कठीण आहे काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.