आज गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच कलाकार मंडळींनी त्यांच्या गुरूंना मानवंदना दिली आहे. अभिनयक्षेत्रात येण्याआधी म्हणा वा सिनेसृष्टीत आल्यानंतर या कलाकरांना त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन देणाऱ्या गुरूंचा प्रत्येकाने आजवर आदरच केला आहे. खरतर प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं. गुरुपौर्णिमेनिमित्त अभिनेत्री स्नेहल तरडे हिने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.(Pravin Tarde Snehal Tarde)
सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे याही सिनेमाविश्वात कार्यरत आहेत. अनेक सिनेमामधून स्नेहल यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्नेहल यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहेत. खरतर त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो गेल्या वर्षीच आहे, आज गुरुपौर्णिमेच औचित्य साधत स्नेहल यांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रवीण तरडे हे स्नेहलला आशीर्वाद देताना दिसत आहेत.
पाहा काय आहे प्रवीण तरडे यांच्या पत्नीचा किस्सा (Pravin Tarde Snehal Tarde)
तर स्नेहल त्यांच्या खाली वाकून पाया पडताना दिसतेय, या खाली स्नेहलने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे, ‘तर झालं असं, की गेल्या वर्षी लंडनला गेलो असताना windsor castle अर्थात राणीचे घर पहायला बाहेर पडलो होतो. Photos, reels असे सगळे आधुनिक सोपस्कार सुरु असतानाच प्रविणचा फोन खणखणायला सुरुवात झाली आणि लक्षात आलं की आज तर गुरुपौर्णिमा! मग सगळं जिथल्या तिथे थांबवून, होतो तिथेच वाकले आणि माझ्या गुरुसख्याचा आशिर्वाद घेतला. पिट्याने त्वरेने हा क्षण कॅमेरात कैद केला ????.(Pravin Tarde Snehal Tarde)
हे देखील वाचा – साईशाची मालिकेतून EXIT चिंगीच्या भूमिकेत दिसणार ही बालकलाकार
स्नेहलने तिच्या गुरूच्या स्थानी तिचे पती प्रवीण तरडे असल्याचं या फोटोद्वारे आणि कॅप्शमधून सांगितलंय. प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे ही लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी आहे. या जोडीने सिनेसृष्टीत बरच नाव कमावलं आहे. प्रवीण तरडे यांच्या पाठीशी स्नेहल या कायमच उभ्या असतात. तसेच यावेळी स्नेहल यांनी त्यांच्या पाठीशी गुरु म्हणून प्रवीण तरडे कायम असल्याचं सांगितलंय.
