‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून पराजूवर प्रेम करणारा आणि खऱ्या प्रेमाची किंमत समजावून सांगणारा दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आधी अनेक दिवसांपासून प्रथमेश-क्षितिजा यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती आणि शेवटी हे दोघे एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकले आहेत. जवळचे नातेवाईक, कुटुंबिय व मित्रपरिवाराच्या खास उपस्थितीत प्रथमेश-क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे.
प्रथमेश व क्षितिजा हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या कामाव्यतिरिक्त आपल्या कामाची माहितीही देत असतात. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही अधिक रस असतो. त्यामुळे ते दोघे शेअर करत असलेल्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. अशातच क्षितिजाने तिच्य इन्स्टाग्रामद्वारे प्रश्नोत्तरांचा खास सेगमेन्ट केला होता. यामध्ये तिला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. यापैकी एका प्रश्नाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

एक नेटकऱ्याने क्षितिजाला “कामाचे आयुष्य तुझ्यासाठी कसे आहे? सोपे की कठीण?, लग्नानंतर तुझे आयुष्य बदलले आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर देत क्षितिजाने असं म्हटलं आहे की, “माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या नवीन कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे व त्याच्या सोबतीमुळे आमचे लग्नानंतरचे आयुष्य अधिक सोपे आणि परिपूर्ण झाले आहे. आम्ही दोघांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे तसेच आमचे यश एकत्र साजरे केल्याने आमचे वैयक्तिक आयुष्यातील व व्यावसायिक आयुष्यातील दोन्ही पैलू बदलले आहेत. ज्यामुळे आम्ही आनंदी जीवन जगू शकत आहोत”
आणखी वाचा – रविवारी कर्क व मकर राशीसह ‘या’ पाच राशींना आर्थिक लभाचे योग, तर ‘या’ राशींवर असणार सूर्यादेवाची विशेष कृपा
दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले.