रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : श्रीवर्धनमध्ये घर, समुद्रकिनारा अन्…; साखरपुड्यानंतर सासरवाडीमध्ये पोहोचला प्रथमेश परब, जावयाचं असं झालं स्वागत

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 17, 2024 | 12:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh Parab reached the in laws home after the wedding ceremony and received a warm welcome

Video : श्रीवर्धनमध्ये घर, समुद्रकिनारा अन्...; साखरपुड्यानंतर सासरवाडीमध्ये पोहोचला प्रथमेश परब, जावयाचं असं झालं स्वागत

मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असून ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच प्रथमेशचा क्षितिजाबरोबर साखरपुडा सोहळा पर पडला. या सोहळ्याचे काही खास क्षण दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साखरपुड्यात प्रथमेशने केलेला डान्सही साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. यावेळी अभिनेत्याने शाहरुख खानच्या गाण्यावर ठेका धरत हटके डान्स स्टेप्स केल्या. तर या डान्समध्ये क्षितिजानेही प्रथमेशला चांगलीच साथ दिली.

अशातच प्रथमेश नुकताच क्षितिजाच्या घरी श्रीवर्धन येथे गेला आहे आणि त्याच्या होणाऱ्या सासरी प्रथमेशचे अगदी गोड आदरातिथ्य करण्यात आले आहे. सासरवाडीत जावयाचे होणारे गोड कौतुक पाहून प्रथमेशही भारावून गेला असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याचे श्रीवर्धनमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. प्रथमेशने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला असून रांगोळीवर “सासुरवाडीत स्वागत आहे” असं लिहिलं आहे.

आणखी वाचा – “भरकटलेल्या मुलींचा सांभाळ…”, बालिकाश्रमाला भेट दिल्यानंतर प्राजक्ता माळीचं लोकांना आवाहन, होत आहे कौतुक, म्हणाली, “मदत करा कारण…”

त्याचबरोबर क्षितिजानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रथमेशबरोबरचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. दोघांनी घरच्या अंगणात बसून क्युट पोज देत एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोवर तिने प्रथमेशला लाडाने जावई म्हणत “जावई अ‍ॅट सासुरवाडी” असं लिहिलं आहे. तसेच यावेळी दोघांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एकमेकांबरोबर निवांत वेळही घालवला. क्षितिजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एकमेकांच्या हातात हात घातलेला एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – आईचा पाठिंबा पण वडील मात्र दुःखी, लेकीच्या घटस्फोटानंतर धर्मेंद्र यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आपल्या मुलांचा संसार तुटताना…”

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश-क्षितिजा यांचा साखरपुडा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच १० दिवसांनी म्हणजेच येत्या २४ फेब्रुवारी रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजनमराठी बातमीक्षितिजा घोसाळकरप्रथमेश परबentertainment newskshitija ghosalkarmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsprathamesh parab
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Suhani Bhatnagar Death

'दंगल'मधील छोट्या बबिता फोगटचं १९व्या वर्षी धक्कादायक निधन, आजाराशी झुंज अपयशी, आई-वडिलांची अवस्था पाहवेना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.