मराठी संगीत विश्वातील सध्याच्या तरुण पिढीमधील लोकप्रिय जोडी म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. अशातच गेले काही दिवस सोशल मीडियावर ही जोडी चांगलीच लोकप्रिय झालेली पाहायला मिळाली. प्रथमेश व मुग्धा हे दोघे नुकतेच विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या लग्नाच्या अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हापासून ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. (Prathamesh Laghate On Instagram)
प्रथमेश-मुग्धा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे हे दोघे त्यांच्याबद्दलचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. ते दोघं गाण्याचे अनेक कार्यक्रम एकत्र करतातच, त्याबरोबरच ते एकत्र असले की, एखादा गाण्याचा व्हिडिओही बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. दोघांची ही केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनादेखील चांगलीच भावते. अशातच प्रथमेशने त्याच्या एकट्याचा फोटो पोस्ट करत त्याला मुग्धाची आठवण येत असल्याचे म्हटले आहे.

प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याचा सेल्फी फोटो काढला आहे आणि या फोटोखाली त्याने “खूप आठवण येत आहे” असं म्हणत मुग्धाला टॅग केलं आहे. प्रथमेश काही कामानिमित्त इंदोरला गेला आहे आणि या इंदोरच्या प्रवासात त्याच्याबरोबर मुग्धा नसल्याने त्याला तिची आठवण येत आहे.
दरम्यान, प्रथमेश-मुग्धा हे दोघे कायमच एकत्र असतात. लग्नानंतर दोघांनी गायनाचे अनेक एकत्र कार्यक्रम केले. त्यामुळे हे दोघे एकत्र असलेले त्यांच्या चाहत्यांनादेखील आवडते. पण आता प्रथमेश काही कामानिमित्त इंदोरला एकटाच गेला असून त्याला मुग्धाची आठवण येत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.