शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दिव्यांग मुलाच्या आईने मला जोरात हाक मारली अन्…”, प्रशांत दामलेंनी सांगितलं नाट्यगृहात काय घडलं?, म्हणाले, “मी निघत असताना…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 3, 2024 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prashant Damle shared the memory of a disabled fan who came to watch his play

"दिव्यांग मुलाच्या आईने मला जोरात हाक मारली अन्...", प्रशांत दामलेंनी सांगितलं नाट्यगृहात काय घडलं?, म्हणाले, "मी निघत असताना..."

आपण करत असलेल्या कामाचे कौतुक होणे, आपली कला प्रत्येकाला आवडणे व एखादा मनुष्य आपल्या कलेचा रसिक होणे ही प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाची गोष्ट असते आणि याच कौतुकासाठी प्रत्येक कलाकार मेहनत घेत असतो आणि प्रत्येक कलाकाराच्या आपल्या चाहत्यांबद्दलचे हे असे अनुभव पदोपदी येतच असतात. असाच एक अनुभव अभिनेते प्रशांत दामले यांनी शेअर केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याच्या निमित्ताने प्रशांत दामलेंनी त्यांच्या एका चाहत्याची आठवण शेअर केली आहे.

मराठी रंगभूमीवरील नाटकाचे विक्रमादित्य म्हणून प्रशांत दामलेंची विशेष ओळख आहे. त्यांनी आजवर अनेक नाटकं, मालिका, चित्रपट व जाहिरातींमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला चाहत्यांचे अनेक किस्से, प्रसंग आहेत. यापैकी एका चाहत्याची आठवण सांगताना त्यांनी असं म्हटलं की, “मराठी नाटक बघायला येणाऱ्या लोकांना आपण नाट्यरसिक का म्हणतो? हा प्रश्न मी स्वत:ला विचारल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर काही उदाहरणे येतात आणि त्यापैकी हे एक उदाहरण मी सांगतो.”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : ‘गुलाबी साडी’वर डान्स करत असताना बायकोवर भडकला प्रसाद ओक, हातात गुलाबी रंगाची बॅग घेऊन आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

प्रशांत दामलेंनी हा किस्सा सांगत असं म्हटलं की, “एका नाट्यगृहामध्ये माझं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुरु होतं आणि त्याच नाट्यगृहात काही दिवसांनी माझं दुसरं नाटक होतं. तर ते नाटक बघण्यासाठी एक विकलांग कुटुंब आले होते. म्हणजे आई-वडील व्यवस्थित पण त्यांचा मुलगा विकलांग होता आणि त्यावेळी मध्यांतरात ते आई-वडील मला भेटायला आले आणि ते मला “आमचा मुलगा फक्त तुमचीच नाटकं बघतो. पण तो तुम्हाला भेटायला वर येऊ शकत नाही कारण तो विकलांग आहे. तर तुम्ही त्याला वर येऊन भेटाल का?” असं म्हणाले. यावर प्रशांत दामलेही त्यांना “हो येतो” असं म्हणाले.

आणखी वाचा – मेष, कन्या व कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे भाग्यशाली, कुणाच्या नशिबात काय असणार?, जाणून घ्या…

यापुढे दामलेंनी असं म्हटलं आहे की, “मी मध्यांतरात त्यांना हो म्हटलं. पण नाटक संपल्यानंतर सगळ्या गडबडीत त्यांना भेटायचं माझ्या डोक्यातून गेलं आणि मी बाकी लोकांना वगैरे भेटून निघालो तर त्या ज्या माता होत्या त्यांनी मला वरुन “आम्ही थांबलो आहोत” अशी हाक मारली. मग् मी वर जाऊन त्या मुलाला जवळ घेतलं त्यच्याबरोबर फोटो काढले. तर असे अनेकानेक प्रसंग माझ्या वाटेला आले आहेत.”    

Tags: marathi actormarathi entertainemnt newsprashant damle
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Prarthana Behere Troll

"कुत्र्यालाच कालवणात टाकशील", कुत्र्याला घेऊन जेवण करणाऱ्या प्रार्थना बेहरेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, "घाणेरडी त्याचे केस हाताला असताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.