मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शक प्रसाद ओकने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने मोठा पडदा देखील गाजवला. आता प्रसाद दिग्दर्शन क्षेत्रातही त्याचा पाया भक्कम करत आहे. याचबरोबर प्रसाद इंस्टाग्रामवर नेहमी सक्रिय असतो. तो त्याचे आणि त्याची पत्नी मंजिरीचे रील इंस्टाग्रामवर सतत शेअर करत असतो. प्रसादने नुकताच एक मजेशीर व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय. (Prasad Oak Funny Video)
प्रसाद या व्हिडियोमध्ये ” मग आता मी काय करू? आता माझ्यामुळे काय झालं? आता मी काय केलं यार? एवढंच चाललंय आयुष्यात” असं म्हणताना दिसतोय. प्रसादच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील मजेशीर कमेंट केल्या आहेत. चाहत्यांना असं वाटतंय की हा व्हिडीओ प्रसादने मंजिरीला उद्देशून पोस्ट केला आहे. चाहते म्हणतायत “आमचं एवढं पण नाही! सुखी आहात तुम्ही सर” तर एकाने म्हटलंय चांगले चाललेय मग तुमचं सेम आहे एकदम नंतर जी शांतता होते ती…बाप रे! अशा मजेशीर कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
हे देखील वाचा: प्राजक्ताची ‘झोप’ चक्क उडाली…
चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी प्रसाद आणि मंजिरी असे व्हिडियो शेअर करत असतात, परंतु प्रसाद आणि मंजिरीने एकमेकांना साथ देत त्यांचे करियर घडविले आहे. त्यामुळे मंजिरीचं त्याच्या आयुष्याची संघिनी आहे असं तो संधी मिळेल तेव्हा सांगायला विसरत नाही. प्रसाद जेव्हा स्ट्रगल करत होता तेव्हा मंजिरीने त्याची पावला पावलाला साथ दिल्याचे तो सांगतो. (Prasad Oak Funny Video)
हे देखील वाचा: देशमुख कुटुंबासमोर ईशाने ठेवली अट,अनिरुद्ध मागणार अनिशची माफी?
तसेच मंजिरी आणि प्रसाद हे अनेक ब्रँड साठी एकत्र फोटोशूट देखील करत असतात. प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेल्या पोस्ट नुसार प्रसाद सावरकरांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी प्रसादने केतकी माटेगावकरसोबत मीरा या चित्रपटाचे कल्यापबोर्ड शेअर करताना चा एक फोटो प्रसादने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. प्रसाद सुद्धा मीरा या चित्रपटात झळकणार आहे. अद्याप प्रसाद ची भूमिका स्पष्ट झालेली नसल्याने प्रसाद हा या चित्रपट काय भूमिका साकारणार हे पाहणे रंजक ठरेल.